Join us  

Shocking !सुशांत म्हणायचा - आता जगायची इच्छा नाही, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 4:28 PM

सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन एजेंसी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला रोज नवं वळण लागतंय. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन एजेंसी या प्रकरणाचा  तपास करत आहेत.  सुशांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं जबाबसमोर आला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, 27 नोव्हेंबरला 2019 ला हिंदुजा हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. दुसर्‍या दिवशी डॉक्टरांनी सुशांतची तपासणी केली आणि त्यादरम्यान त्याने त्याला सांगितले की तो डिप्रेशनमध्ये आहे. डॉक्टर म्हणाले, ''सुशांतने मला सांगितले की, त्याला झोप येत नव्हती आणि भूक लागत नव्हती. त्याला आयुष्यात काहीही आवडत नव्हते आणि म्हणायचे की, आता जगण्याची इच्छा नाही.'' 30 नोव्हेंबरला सुशांतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. 

डॉक्टर पुढे असेही म्हणाले की, सुशांतने मात्र आत्महत्या करण्याचा विचार असल्याचे कधीही म्हटले नाही. पण त्याची अवस्था पाहून दिसत होतो की तो अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांतला वाटते होते की आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत. त्याला असुरक्षित वाटायचे. पण यामागचे कारण मनातील नकारात्मक विचारसरणी होती.

रिया व सॅम्युअल मिरांडाच्या घरी धाड रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने धाड टाकली आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्यासोबत रिया व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया व तिच्या भावालाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत