Join us  

रिया चक्रवर्तीला संध्याकाळी होऊ शकते अटक! ईडीकडून 3 टप्प्यात चौकशी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 1:56 PM

ईडीने तयार केली प्रश्नांची भलीमोठी यादी...

ठळक मुद्देसुशांतच्या खात्यातून 15 कोटी रूपये काढल्याचा आरोप रियावर आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती अंमलबजावणी संचलनालयापुढे (ईडी) चौकशीसाठी हजर झाली आहे. सध्या तिची चौकशी सुरु आहे. आज दिवसभर चौकशी झाल्यानंतर कदाचित संध्याकाळी रियाला अटकेची चिन्हे आहेत.रियाने ईडीला जबाब पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र ईडीने ही विनंती अमान्य केली आणि रियाला चौकशीसाठी हजर राहणे भाग पडले. सूत्रांचे मानाल तर, ईडी रियाला तीन टप्प्यात चौकशी करू शकते. ईडीने प्रश्नांची एक भलीमोठी यादीच तयार केली आहे.

पहिल्या टप्प्यात रियाची वैयक्तिक माहिती विचारली जाऊ शकते. दुस-या टप्प्यात रियाचे पॅन कार्ड डिटेल्स, उत्पन्नाचा स्रोत, रिटर्न, तिच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार, एकूण संपत्ती, भावाचा बिझनेस, पासपोर्ट डिटेल्स याबाबत ईडी प्रश्न विचारू शकते.तिस-या टप्प्यात सुशांतबद्दलचे प्रश्न तिला विचारले जाऊ शकतात. सुशांतसोबतचे, त्याच्या कुटुंबासोबतचे नाते, सुशांतचे आर्थिक व्यवहार याबद्दल तिची कसून चौकशी होऊ शकते. यानंतर कदाचित संध्याकाळी रियाला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रूपये काढल्याचा आरोप रियावर आहे. सुशांतचे वडील के.के. सिंग यांनी रियाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी  रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेल्याचे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रियाने करोडो रुपये प्रॉपर्टी खरेदीसाठी वापरल्याचा आरोप केला जात आहे. तसेच रियाचा भाऊ शोविकची देखील ईडी चौकशी करू शकते.  

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत