Join us  

सुशांतने 50 सिमकार्ड बदलले, सुसाईड नोट सापडली नाही...!  शेखर सुमनने उपस्थित केले अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:03 PM

अभिनेता शेखर सुमनने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी पुढे रेटली आहे. आपल्याला दिसतेय तेवढे हे प्रकरण साधे नाही, असे त्याने म्हटले आहे.  

ठळक मुद्देसुशांतने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या आत्महत्येमागे दोषी असलेल्यांना शोधून काढावे आणि सुशांतला न्याय मिळवून द्यावा, असेही तो म्हणाला.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मुंबई पोलिस या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात अभिनेता शेखर सुमनने आता या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी पुढे रेटली आहे. आपल्याला दिसतेय तेवढे हे प्रकरण साधे नाही, असे त्याने म्हटले आहे.  मंगळवारी पत्रकार परिषदेत शेखर सुमनने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती दिली.सुशांतच्या घरात सुसाइड नोट न मिळण्यापासून तर त्याच्या गळ्यावरची जखम अशा अनेक गोष्टींवर तो बोलला. 

 

काय म्हणाला शेखर सुमन?

 सुशांतच्या घरात सुसाइड नोट मिळाली नाही, घराची बनावट चावीसुद्धा सापडली नाही आणि त्याने महिन्याभरात ५० वेळा सिमकार्ड्स बदलले होते. सुसाइड नोट सापडली असती तर हे प्रकरण तिथेच संपले असते. पण सुसाइड नोट न मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जो मुलगा रात्री पार्टी करत होता, सकाळी उठून प्ले स्टेशनवर खेळत होता. ज्यूस घेऊन निवांत बसला होता. त्याने अचानक इतक्या टोकाचे पाऊल का उचलावे? त्याने गेल्या काही महिन्यांत 50 सिमकार्ड बदलले होते. सिम कार्ड कोणीही का बदलतो? एखाद्याला टाळण्यासाठीच कुठलीही व्यक्ती सिम कार्ड बदलते. जी उंची सांगितली जातेय, त्यावरूनही अनेक प्रश्न निर्माण होता. सुशांतची उंची 6 फूट होती. बेडवर चढल्यानंतर इतकी जागाच उरत नाही की तुम्ही छताला लटकू शकाल. त्याच्या गळ्यावर जी जखम आहे, ती बघता त्याने त्याच्या कुर्त्याने गळफास घेतला असता तर ही जखम आणखी मोठी असाला हवी होती. त्याच्या गळ्यावर दोराचे व्रण आहे, असे शेखर सुमन या पत्रकार परिषदेत म्हणाला. सुशांतची आत्महत्या दिसते इतके साधेसोपे प्रकरण नाही, असे माझे मत आहे. सुशांतने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या आत्महत्येमागे दोषी असलेल्यांना शोधून काढावे आणि सुशांतला न्याय मिळवून द्यावा, असेही तो म्हणाला.

टॅग्स :शेखर सुमनसुशांत सिंग रजपूत