Join us  

सुशांत सिंह राजपूतच्या लीक झालेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, रियाच पैसे करत होती मॅनेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 1:17 PM

लीक झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत सिंह राजपूत आपल्या भविष्य, मानसिक स्थिती आणि पैशांबाबत चिंतेत असल्याचं समजतं. ही ऑडिओ क्लिप साधारण ५ महिन्यांआधीची असल्याचं सांगितलं जात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमागील सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सीबीआयच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागल्याचे समजते. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. लीक झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत सिंह राजपूत आपलं भविष्य, मानसिक स्थिती आणि पैशांबाबत चिंतेत असल्याचं समजतं. ही ऑडिओ क्लिप साधारण ५ महिन्यांआधीची असल्याचं सांगितलं जात आहे. जानेवारी महिन्यातील या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत रिया चक्रवर्ती तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि मॅनेजर श्रुती मोदीसोबतच फायनॅन्शिअल अ‍ॅडव्हायजरसोबत बोलताना ऐकू येते.

रिया करत होती पैशांचं प्लॅनिंग

लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतचे पैसे मॅनेज करताना ऐकायला मिळते. ही ऑडिओ क्लिप साधारण ३६ मिनिटांची असल्याचे सांगितले जात आहे. आजतकच्या एका रिपोर्टनुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला त्याच्या पैशांची एफडी करण्यावर जोर देत आहे. रिया म्हणते की, 'मी फक्त यामुळे हे सांगतेय, समजा मी तिथे नसेल, श्रुती मोदीही नसेल, सॅम्युअल नसेल आणि सुशांत एखाद्या नव्या माणसासोबत असेल. त्याच्या हाती सुशांतच कार्ड लागलं तर? त्यामुळे मी सुशांतला एफडी बनवण्याचा सल्ला देईन. आपण पूर्ण पैसा एफडीमध्ये ठेवू. कार्डमध्ये १० ते १५ लाख रूपयांपेक्षा जास्त असू नये. याने सुशांतला त्याच्या पैशांचं व्याजही मिळेल. जेव्हा गरज असेल तेव्हा तो एफडी तोडूही शकतो'.

इतकेच नाही तर या ऑडिओ क्लिपमध्ये रियाच जास्त वेळ बोलताना ऐकायला मिळते. तर सुशांत पुन्हा पुन्हा आपल्या मानसिक शांततेच्या शोधात आपले खर्च कमी करणे आणि मुंबईच्या बाहेर शिफ्ट होण्याबाबत बोलत आहे. यात सुशांत त्याच्या मानसिक शांततेबाबतही बोलला होता.

मानसिक शांततेच्या शोधात सुशांत...

सुशांत बोलला होता की, 'मी मोठ्या मुश्कीलीने रूमबाहेर येऊ शकत आहे. मी हे केवळ माझ्या बौद्घिक शांततेसाठी करत आहे. कोणत्याही आर्थिक कारणाने नाही.  यावेळी माझा मेंदू या स्थितीत नाहीय. मला एका दिवशी काहीतरी वेगळं वाटतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं. मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही'.

ट्रस्ट बनवण्याचा विचार

खास बाब ही आहे की, या संवादात फायनॅन्शिअल अ‍ॅडव्हायजर त्याला एका ट्रस्ट बनवण्याचा सल्ला देत होता. जो त्याच्या पैशांना व्यवस्थित मॅनेज करेल आणि कमी रिक्समध्ये सुरक्षित इन्व्हेस्टमेंट ठरेल. यादरम्यान फायनॅन्शिअल अ‍ॅडव्हायजरने जेव्हा ट्रस्टचा सल्ला दिला तेव्हा रियाने त्याला  विचारले की, 'जर समजा जर आम्ही १० रूपये ट्रस्टमध्ये लावले आहेत. पण आम्हाला आता आमच्या पैशांची एफडी काढायचीय किंवा म्युचुअल फंडमध्ये टाकायचेत. तर अशा स्थितीत ट्रस्ट आम्हाला असं करू देईल का? यावर अ‍ॅडव्हायजर म्हणाला की, 'हा निर्णय तर ट्रस्टीच करू शकतील की, कशात कमी रिस्कसोबत चांगले रिटर्न्स मिळतील.

सुशांतच्या घरी दोन Ambulance का आल्या होत्या? ड्रायव्हरने केला खुलासा...

सीबीआयच्या 'त्या' प्रश्नावर चवताळली रिया चक्रवर्ती, अधिकाऱ्यांसोबत घातला वाद?

...और उसका "ईलाज" करवा रही हो; सुशांतच्या वडिलांनाही होती त्याच्या आजाराची माहिती?

काय आहे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन?

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीबॉलिवूड