Join us

सुशांत सिंग राजपूत म्हणाला; बेफिक्रेची आॅफर मला नव्हतीच; मी तो केलाही नसता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 19:50 IST

तब्बल आठ वर्षानंतर आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बेफि क्रे’ या चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. यामागचे कारणही ...

तब्बल आठ वर्षानंतर आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बेफि क्रे’ या चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. यामागचे कारणही तसेच आहे. सुशांत सिंग राजपूतने एका मुलाखती दरम्यान मला बेफ्रि केविषयी विचारणा करण्यात आली नव्हती. या बद्दल मला विचारणा करण्यात आली असती तरी देखील मी यात काम केलेच नसते असे त्याने सांगितल्याने खळबळ माजली आहे. मागील वर्षी ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतच्या अभिनयाची प्रेक्षकांनी व समीक्षकांनी प्रशंसा केली. बॉक्स आॅफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता. दरम्यान आदित्य चोपडा यांनी बेफिके्र  या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतला विचारणा करण्यात आली होती अशा बातम्या झळकत आहेत. यावर सुशांत सिंगने खुलासा केला आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशांत म्हणाला, मला येथे सांगावेसे वाटते की मला कधीच ‘बेफिक्रे’बद्दल विचारण्यात आले नाही. जरी या चित्रपटाबद्दल मला विचारणा करण्यात आली असती तरी मी तो केला नसता. ‘बेफि क्रे’च्या स्टोरीबद्दल मला अनेकांनी सांगितले होते. तरी देखील मी हा चित्रपट नाकारला असता यासाठी माझ्याजवळ कारण होते. यशराज बॅनरने मला जर ब्योमकेश बक्षी सारख्या चित्रपटांची आॅफर दिली असती तर मी ती आनंदाने स्वीकारली असती, असे मत सुशांत सिंगने व्यक्त केले. सुशांत सिंग या मुलाखती दरम्यान बेधडक दिसला. ‘बेफिक्रे’बद्दल मत व्यक्त करताना तो म्हणाला. हा चित्रपट भारतीय तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारा मानला गेला. मात्र, तसे नाही कारण जर तो तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारा असता तर त्याने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली असती, परंतु तसे झाले नाही. मला चित्रपटातून नेहमी वास्तविक कथानक मांडले जावे असे म्हणायचे नाही तर चित्रपट काल्पनिकही असू शकतो मात्र त्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पडायला हवी. सुशांत सिंग राजपूतने ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटानंतर आपली फी वाढविली असून, तो सध्या एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये आकारतो आहे. त्याने यशराज बॅनरच्या वाणी कपूर व परिणीता चोप्रा यांच्यासोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात काम केले आहे.