Join us  

इन्स्टाग्रामवर वाढलेत सुशांतचे फॉलोअर्स, इतक्या लोकांनी मृत्यूनंतर सोशल मीडियावर केले फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 9:50 AM

सुशांतच्या चाहत्यांच्या भावना बघता, त्याच्या इन्स्टा अकाऊंटला Memorialized  करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या निधनापूर्वी त्याचे इन्स्टाग्रामवर 9 मिलियन म्हणजे सुमारे 90 लाख फॉलोअर्स होते

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र सोशल मीडियावर त्याच्या आत्महत्येमागच्या कारणांसह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा सुुरु आहे. सुशांतच्या मृत्यूला दोन आठवडे झालेत पण लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत. इतकेच नाही तर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टवरही प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे त्याला फॉलोही करत आहेत. 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या लाखाच्या घरात वाढली आहे.

होय, काही दाव्यानुसार सुशांतच्या निधनापूर्वी त्याचे इन्स्टाग्रामवर 9 मिलियन म्हणजे सुमारे 90 लाख फॉलोअर्स होते. आता ही फॉलोअर्सची संख्या 13.9 मिलियन म्हणजे 1 कोटी 39 लाख झाली आहे. म्हणजेच मृत्यूनंतर त्याचे 50 लाख फॉलोअर्स वाढले आहेत. सुशांत आता या अकाऊंटवर कधीच पोस्ट करणार नाही, हे ठाऊक असूनही लोक त्याला फॉलो करत आहेत.

सुशांतने आईसाठी शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टला 40 लाखांवर लोकांनी लाइक्स केले होते.इन्स्टावर सुशांतच्या चाहत्यांच्या भावना बघता, त्याच्या अकाऊंटला Memorialized  करण्यात आले आहे. सुशांतच्या बायोमध्ये त्याच्या नावाच्या पुढे Remembering जोडण्यात आले आहे. सुशांत बॉलिवूडचा पहिला अभिनेता आहे, ज्याचे इन्स्टा अकाऊंट अमर करून इन्स्टाग्रामने त्याला अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

इन्स्टाग्रामवरच्या ज्या अकाऊंटला Memorialized करण्यात येते, त्यात कुठलाही बदल केला जाऊ शकत नाही. एकप्रकारे ऑनलाइन स्मारकाप्रमाणे त्याचे हे अकाऊंट जिवंत राहते. अनेक वर्षांनंतरही या अकाऊंटवर चाहते सुशांतचे फोटो पाहू शकतील.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत