Join us  

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नाव येताच रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव, दाखल केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 1:09 PM

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात, रकुल प्रीत सिंगने मीडिया खटल्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात, रकुल प्रीत सिंगने मीडिया खटल्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्या वकीलांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, माहिती व प्रसारण मंत्रालयाला एक निर्देश द्यावी की, तिचे नाव प्रसारमाध्यमांनी घेऊ नये. 

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या याचिकेवर हायकोर्टाने केंद्राकडे जाब विचारला ज्यात तिने रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणात जोडल्या गेलेल्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणावर स्थगिती मागितली आहे. कोर्टाने केंद्र, प्रसार भारती आणि पत्रकार परिषद यांना लवकरच निर्णय घेण्यास सांगितले. रिया चक्रवर्तीशी संबंधित खटल्यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगशी संबंधित बातम्यांमध्ये माध्यमांना संयम ठेवण्याची अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली आहे.

रकुल प्रीतने याचिकेत काय म्हटलेरकुलने याचिकेत म्हटले आहे की, शूटिंग दरम्यान आपल्याला हे समजले की रिया चक्रवर्तीने तिचं नाव आणि सारा अली खानने नाव घेतले आहे ज्यानंतर माध्यमांमध्ये बातमी दाखवली जाते आहे. रकुलच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले की मीडिया रकुल प्रीतला त्रास देत आहे.कोर्टाने अभिनेत्रीला विचारले की तिने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार का केली नाही ?

ड्रग्स अँगलमध्ये आले होते रकुलचे नावएनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने बॉलिवूडमधील 25 सेलिब्रेटींच्या नावाचा खुलासा केला. रिपोर्टनुसार रियाने सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंगसह अन्य लोकांची नावं घेतली आहे. 

सुशांतच्या फार्म हाऊसमधून वस्तू जप्त तपास पथकाला सुशांतच्या फार्म हाऊसमधून हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात अनेक कान्याकोपऱ्यातून सातत्याने चौकशी करत असते.. यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंग राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्ज मागत असत, हाच जबाब रिया आणि अटक केलेल्या लोकांनी एनसीबीला दिले आहेत. 

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...'

 

टॅग्स :रकुल प्रीत सिंगसुशांत सिंग रजपूत