Join us  

रेप्युटेशनला खूप जपायचा सुशांत, रियाकडून सुटका मिळावी यासाठी केले होते अनेक प्रयत्न पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:12 PM

सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता.

छोटा पडदा ते मोठा पडदा असा कलाकार म्हणून घडलेला सुशांतने आपल्या छोट्याशा करिअर काळात रसिकांची पसंती मिळवली होती. सलमान शाहरूखप्रमाणे त्याला तगडे मानधनही मिळत नसले तरीही त्याची खूप मोठी स्वप्न होती. मनाने सुशांत श्रीमंत होता. फिल्मी करिअरमध्ये हवे तशा समाधानकाकर आफर्स मिळत नसल्यामुळे तो चिंतेत होता असे बोलले जाते. 

 

लव्हलाईफही त्याची खास नव्हती. अंकिता लोखंडेसह ब्रेक अप झाल्यानंतर तो रिया चक्रवर्तीसह त्याची जऴलीक वाढत गेली. पण रिया त्याला नकोशी झाल्याचेही माहिती समोर येत आहे. मुळात सुशांतला स्टारडम जपणे, त्याची रेप्युटेशन जपणे या गोष्टी त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या.  रिया सुशांतच्या आयुष्यात त्याला मिळालेली प्रसिद्धी, मानसिक शांतता, कुटुंबामध्ये अडचणी निर्माण करत असल्याचे त्याला लक्षात आले होते. म्हणून 2020 मध्ये त्याने केलेले प्लॅन रियाला सांगितले नसल्याच्याही चर्चा आहेत.

रियाचा बऱ्याच गोष्टींचा खर्च हा सुशांतच्या अकाऊंटमधून होत असल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या बँक खात्यासंदर्भात ईडीला नवीन माहिती मिळाली आहे. गोकुलम फिल्म्स नावाच्या कंपनीने रियाला मार्च 2019 मध्ये 72 हजार रुपयांद्वारे पाठवले होते. सुशांतने गोकुलम फिल्म्सला नोव्हेंबर 2019 मध्ये तीन लाख रुपये दिले होते. सुशांतचा आर्थिक व्यवहारावर रियाच्या अकाऊंटमधून झाल्याची शंका आहे.

 

रियाला सुशांतच्या लाईफस्टाईल पासून ते त्याचा खर्च सगळ्याच गोष्टी माहिती होत्या.सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. त्यामुळे यात सीएही सहभागी असल्याचा संशय वर्तवण्यात आला होता.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत