Join us

सुशांतसिंग-कंगणा येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 23:25 IST

कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे सध्या बॉलीवूडमध्ये वातावरण हॉट झाले आहे. एकमेकांना नोटिसा पाठवल्याने त्याला ...

कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे सध्या बॉलीवूडमध्ये वातावरण हॉट झाले आहे. एकमेकांना नोटिसा पाठवल्याने त्याला कायदेशीर आधार मिळाला आहे. पण, कंगणाकडे सध्या खुप चित्रपटांच्या असाईनमेंट्सही आल्या आहेत.‘अँग्री यंग लेडी’ म्हणून बॉलीवूडमध्ये तिला म्हटले जात आहे. कंगणा दीपिका पदुकोनच्या एका जवळच्या मित्रासोबत होमी अदजानिया च्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळणार आहे. तसेच सुशांतसिंग राजपूत यालाही मुख्य भूमिकेसाठी कंगणाच्यासोबत घेण्यात आले आहे.अजून काहीच निश्चित नाही. प्रत्येकजण त्यांच्या आगामी प्रोजेक्ट काय असेल? स्क्रिप्ट याविषयी उत्सुक आहे. दीपिकाने कॉकटेलमध्ये जसे काम केले आहे त्याप्रमाणे ती करू शकेल का? असा प्रश्न निर्मात्यांसमोर आहे.