Join us  

'सुशांतने सुसाईड नोट लिहिली असणार', शेखर सुमनचं खळबळजनक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:42 PM

शेखर सुमनचे हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. मात्र अभिनेता शेखर सुमनने दावा केला आहे. त्याने सुशांतने आत्महत्येपूर्वी नक्कीच पत्र लिहून ठेवलं असणार असे म्हटले आहे.शेखर सुमनने ट्विट केले की, सुशांत सिंग राजपूतसारखा हुशार, हिमती, प्रचंड इच्छा शक्ती असलेल्या व्यक्तीने जर आत्महत्या केली असेल तर नक्कीच त्याने आत्महत्येपूर्वी पत्र लिहून ठेवले असणार. इतरांप्रमाणेच मला मनापासून वाटते आहे जे दिसते आहे त्यापेक्षा परिस्थिती बरीच वेगळी आणि गंभीर आहे.

शेखर सुमनचे हे ट्विट चर्चेत आले आहे. यापूर्वीदेखील त्याने सुशांतच्या आत्महत्येनंतर एक ट्विट केले होते. त्यात त्याने म्हटले होते की, सिनेइंडस्ट्रीत वाघ होऊन फिरणारे आज सुशांतच्या चाहत्यांचा आक्रोश पाहून घाबरुन लपून बसले आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. त्याने नैराश्यात आत्महत्या केली असे म्हटले जात असले तरी तो बॉलिवूडच्या नेपोटिझमचा बळी ठरला, असे अनेक लोक मानत आहेत. कंगनाने तर सुशांतची आत्महत्या नव्हतीच तर हा प्लान मर्डर आहे, असे म्हटले आहे. सुशांतला बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा समाना करावा लागला होता. त्याला कधीच कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळेच त्याने नैराश्यात हे पाऊल उचलले असल्याचे अनेकांचे मत आहे.

टॅग्स :शेखर सुमनसुशांत सिंग रजपूत