Join us  

 रिया चक्रवर्तीने ईडीपासून लपवला दुसरा मोबाईल नंबर, आज पुन्हा चौकशी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 10:19 AM

ईडीने तिच्या दुस-या फोनचे कॉल रेकॉर्ड दाखवले तेव्हा कुठे रियाने दुसरे सिम वापरत असल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देसुशांत प्रकरणात सीबीआयच्या तपासाबद्दल सांगायचे तर सीबीआयने 6 ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्या हाती घेतला असतानाच या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) या प्रकरणाचा तपास करतेय. ईडीने गेल्या शुक्रवारी रिया चक्रवर्तीची 8 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने तिचा दुसरा मोबाईल नंबर लपवल्याचे समोर आले आहे.मोबाईल नंबर लपवल्यामुळे नाराज ईडीने आता रियाचा हिडन डाटा मिळवण्याची तयारी केली आहे. आज पुन्हा ईडी रियाची चौकशी करणार आहे.

ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रियाला तिचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जमा करण्यास सांगितले. यावेळी तिने तिचा एक दुसरा फोन नंबर सांगितला नाही. हा नंबर ती वापरत असूनही तिने त्याबद्दलची माहिती लपवून ठेवली. ईडीला मात्र याची माहिती होती. ईडीने तिच्या दुस-या फोनचे कॉल रेकॉर्ड दाखवले तेव्हा कुठे तिने दुसरे सिम वापरत असल्याची कबुली दिली.

रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनाही समन्स

ईडीने रियाची चौकशी केली, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याचीही चौकशी केली. आता ईडीने रियाला दुसºयांदा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. शिवाय तिच्या वडिलांनाही समन्स जारी केला आहे. त्यानुसार आज रिया व तिचे वडील या दोघांचीही चौकशी होऊ शकते. ईडीने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी यालाही समन्स  जारी केला आहे.सुशांत प्रकरणात सीबीआयच्या तपासाबद्दल सांगायचे तर सीबीआयने 6 ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे. आपल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रिया, रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, रियाची आई संध्या, भाऊ शोविक, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांना आरोपी बनवले आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत