Happy birthday u cartoon
सूरज पांचोलीच्या जीवनात आथियाचे स्थान महत्त्वाचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 20:31 IST
बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली हा आपल्या जीवनात आथिया शेट्टीचे महत्त्वाचे स्थान असल्याचे म्हणतो आहे. नुकताच आथियाने आपला 24 वा ...
सूरज पांचोलीच्या जीवनात आथियाचे स्थान महत्त्वाचे!
बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली हा आपल्या जीवनात आथिया शेट्टीचे महत्त्वाचे स्थान असल्याचे म्हणतो आहे. नुकताच आथियाने आपला 24 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना त्याने ही कबुली दिली. आथिया शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सूरज लिहतो, ‘‘कार्टून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, तू माझ्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहेस यासाठी तुझे आभार, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आथिया शेट्टी!’’ आथियाने यावर आपला रिप्लाय दिला असून ‘‘अत्तू, टिया, गुजार, कार्टून, पागल एवढी सारी नावे एका मुलीची’’ असे लिहिले आहे. सोबतच काही इमोजीमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आथिया व सूरज यांच्यात किती जवळीक आहे हे या ट्विटवरून कळते. आथिया ही सूरजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग का असावी याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. मात्र दोघांनी एक त्र बॉलिूवडमध्ये पदार्पण केले होते. सुभाष घई यांचा सुपरहिट चित्रपट हिरो चा रिमेक असलेल्या हिरो या चित्रपटातून आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज व सुनील शेट्टीची मुलगी आथिया यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. सोबतच आथियाचा वाढदिवस येतानाच सूरजच्या काही अडचणी कमी झाल्या आहेत. सूरजची एक्स गर्लफ्रेण्ड जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणातून त्याला दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या मते जियाचा मृत्यू हत्या नव्हे तर आत्महत्याच होती असे सांगण्यात आले आहे तर सीबीआयने देखील असाच अहवाल दिला आहे. अनिस बज्मी यांच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटात अनिल कपूर, इलियाना डिक्रुझ, अर्जून कपूर यांच्यासह आथिया देखील दिसणार आहे. तर सूरज पियरे टिमिन्स यांच्या चित्रपटात एका खेळाडूच्या रुपात दिसणार आहे.