Join us

रईस’ची ‘सुल्तान’ला सरप्राईज व्हिजिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 10:59 IST

शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या भेटीची बातमी होणार नाही, तर मग नवलच!  फिल्म सिटी स्टुडिओमध्ये शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाचे ...

शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या भेटीची बातमी होणार नाही, तर मग नवलच!  फिल्म सिटी स्टुडिओमध्ये शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाचे शुटींग सुरु होते. याचठिकाणी सलमानही ‘सुल्तान’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे शुटींग करीत असल्याचे शाहरूखला कळले आणि मग त्याने चक्क ‘सुल्तान’च्या सेटला सरप्राईज व्हिजिट द्यायचे ठरवले. शाहरूख सेटवर पोहोचला आणि खरोखरचं त्याला पाहूल सलमान पार सरप्राईज झाला. दोन्ही खान जॉय मूडमध्ये एकमेकांना भेटले. यावेळी सलमानने शाहरूखला सुल्तानचे काही सीनही दाखवले. यावर्षी ईदला सलमानचा ‘सुल्तान’ प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अगदी टाईट शेड्यूलमध्ये ‘सुल्तान’ची शुटींग सुरु आहे. दुसरीकडे शाहरूखच्या ‘रईस’चे शुटींग जवळपास पूर्ण झाले आहे.