Join us

मुलाच्या हिरोईनसाठी सनीची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 14:02 IST

सनी देओल आपल्या मुलाच्या बॉलिवूड पर्दापणासाठी जोरदार तयारी करत आहे. मोठा मुलगा करण याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल ...

सनी देओल आपल्या मुलाच्या बॉलिवूड पर्दापणासाठी जोरदार तयारी करत आहे. मोठा मुलगा करण याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल स्वत: करणार आहे. लवकरच तो आपल्या टीमसह दिल्लीला जाऊन चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध घेणार आहे. ‘पल पल दिल के पास’ असे या चित्रपटाचे नाव असण्याची शक्यता आहे.अभिनेत्रीसाठी सनीने काही अटी ठेवल्या आहेत. ती दिल्लीची रहिवासी असावी. व तिचे वय १६ ते २० वर्षाच्या दरम्यान असावे अशा त्या अटी आहेत. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या नवअभिनेत्रीचा शोध सुरु होणार आहे.  दिल्लीतच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याची चर्चा आहे. चला तर म्हणजे देओल खानदानाची पुढची पिढी चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमावण्यासाठी तयार झाली आहे.