Join us  

 त्यांनी मला मोठ मोठी स्वप्नं दाखवलीत...! सनी लिओनीचा भ्रमनिरास!  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:11 PM

सन २०१३ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीतून बाहेर पडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या काहीसी नाराज आहे. होय, बॉलिवूडमधील पाच वर्षांच्या प्रवासाने तिचा भ्रमनिरास केला आहे आणि यातूनचं सनीने बॉलिवूडवर काही गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देहोय, बॉलिवूडवाल्यांनी मला मोठ मोठी स्वप्ने दाखवलीत. पण ही सगळे स्वप्ने पोकळ ठरलीत, असे सनीने म्हटले आहे.

सन २०१३ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीतून बाहेर पडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या काहीसी नाराज आहे. होय, बॉलिवूडमधील पाच वर्षांच्या प्रवासाने तिचा भ्रमनिरास केला आहे आणि यातूनचं सनीने बॉलिवूडवर काही गंभीर आरोप केले आहेत. होय, बॉलिवूडवाल्यांनी मला मोठ मोठी स्वप्ने दाखवलीत. पण ही सगळे स्वप्ने पोकळ ठरलीत, असे सनीने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर आता स्वत:च्या करिअरचे निर्णय स्वत: घेण्याचे तिने ठरवले आहे.

काही दिवसांपूर्वी सनीने स्वत:च्या आयुष्यावर एक वेबसीरिज बनवली. ही वेबसीरिजही फ्लॉप झाली आणि आता सनी पती डेनियल वेबरसोबत आपल्या तीन मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे. अर्थात याऊपरही बॉलिवूडमध्ये चमकण्याची आशा तिने सोडलेली नाही.

अलीकडे एका मुलाखतीत सनी यावर बोलली. मला आता चांगल्या स्क्रिप्ट हव्या आहेत. मला सर्व प्रकारच्या चित्रपटांत काम करायचे आहे. पण माझ्यासमोरची सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे, चांगल्या व्यक्तिंचा शोध. मला मोठ मोठी स्वप्न दाखवणा-यांसोबत मी सुरुवातीला काम केले. त्यांनी मला स्टार बनण्याची स्वप्न दाखवली. पण हे लोक माझ्यासाठी चांगले चित्रपट बनवू शकले नाहीत. मी त्यांच्या मनासारखा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला. चित्रपटांसाठी वर्कशॉप केलेत. तासन् तास बसून प्रॅक्टिस केली. मी वेडी होते की, उत्साहाच्या भरात कित्येक तास आधी सेटवर जावून बसायचे, असे सनी म्हणाली.आता मी कुठलाही निर्णय घाईघाईत घेणार नाही. सक्षम दिग्दर्शकांसोबतचं काम करेल, असेही ती म्हणाली.

अभिनेत्री म्हणून सनी लिओनीचे ‘जिस्म 2’ व ‘रागिणी एमएमएस 2’ काहीअंशी यशस्वी ठरलेत. पण जॅकपॉट, एक पहेली-लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे, वन नाईट स्टँड, बेईमान लव, तेरा इंतजार हे तिचे चित्रपट दणकून आपटलेत. अर्धा डझन चित्रपटांची तर लागतही वसूल होऊ शकली नाही. याऊपर सनीला चमकण्याची इच्छा असेल तर तिच्या हिंमतीची आणि संयमाची दोन्हीची दाद द्यावी लागेल.

टॅग्स :सनी लिओनी