Join us  

सनी लिओनीला इंप्रेस करण्यासाठी नवरा डॅनिएलने केली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:33 PM

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते.  तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. 

मीडिया रिपोर्टनुसार, एका पार्टीत सनी आणि डॅनिअल यांची भेट झाली. तिला बघताच डॅनिअल प्रेमात पडला. त्याने तिला डेटवर येण्याची बऱ्याच वेळी विनंती केली. परंतु, प्रत्येक वेळी तिने हा मागणी धुडकावून लावली.

सनी लिओनीला इंप्रेस करण्यासाठी डॅनिएल वेबरला खूप प्रयत्न करावे लागले होते. त्याने सनीसाठी हॉटेलवर तब्बल २४ गुलाबजाम पाठवले होते. त्यानंतर कुठे थोडेफार त्याचं इंप्रेशन सनीवर पडलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न केले होते.

पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून प्रवेश करणारी सनी लिओनी पहिलीच अभिनेत्री असावी. तिच्या करिअरविषयी बोलताना तिच्या नवऱ्याचा हमखास उल्लेख होतो. ती आपल्या यशाचे श्रेय नवऱ्याला म्हणजेच डॅनिएल वेबरला देते.  

वेबर सनीचा बिझनेस मॅनेजर असून दोघांच्या प्रॉडक्शन कंपनीचा प्रमुख आहे. डॅनिअलने स्क्रिप्ट बघितल्याशिवाय सनीपर्यंत पोहोचत नाही. सनीप्रमाणेच डॅनिअल यानेही काही पॉर्न फिल्ममध्ये काम केले होते. तो जॅकपॉट या चित्रपटात दिसला होता. 

सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे.

‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे,बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.

टॅग्स :सनी लियोनीसनी लिओनी