Join us  

​सनी लियॉन गाणार प्रो-कबड्डी लीगमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2016 7:45 AM

काही दिवसांपूर्वी सनी लियॉनने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यात ती माईक जवळ उभी असून गाताना दिसत होती. ...

काही दिवसांपूर्वी सनी लियॉनने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यात ती माईक जवळ उभी असून गाताना दिसत होती. चाहत्यांना वाटले की, ती कोणत्या चित्रपटात गाणार की काय? मात्र चित्रपटात गाण्याऐवजी ती  प्रो-कबड्डी लीगमध्ये राष्ट्रगीत गाणार आहे. यावेळी तिच्यासोबत बाहुबलीचा अभिनेता राणा दुग्गाबतीही असेल. विशेष म्हणजे सनी लिआॅनने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही.खेळाला प्रमोट करणाºया गोष्टींचे आपण पैसे घेत नसल्याचं  सनी लिआॅनने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, याआधी अनेक अभिनेत्रींना प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरुन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट, श्रुती हसन आणि सोनाक्षा सिन्हा यांचा समावेश आहे. मात्र, आता ही संधी अभिनेत्री सनी लिआॅनला मिळणार आहे.