Join us  

अमेरिकेने रिजेक्ट केलेल्या सनी लिओनीचे नशीब महेश भट्ट नाही, तर 'या' अभिनेत्रीमुळे पालटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 2:25 PM

पूजा भट्टने सांगितले तिला मिळणाऱ्या सिनेमांच्या ऑफर पाहुन ती घाबरुन गेली होती म्हणून तिने 23व्या वर्षी निर्मिती आणि दिग्दर्शनात पदार्पण केले

ठळक मुद्देसनी लिओनीला अमेरिकेन इंडस्ट्रीने नाकारले होते सनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती

पूजा भट्टने सांगितले तिला मिळणाऱ्या सिनेमांच्या ऑफर पाहुन ती घाबरुन गेली होती म्हणून तिने 23व्या वर्षी निर्मिती आणि दिग्दर्शनात पदार्पण केले. पूजा नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त कोलकात्ताला गेली होती.

पूजा दिग्दर्शकांना स्क्रिप्टबाबत विचारायला लागली होती. दिग्दर्शकांचे म्हणणे होते की महेश भट्ट यांची मुलगी आणि म्हणून डोक खराब आहे. पूजा पुढे म्हणाली, मी तमन्ना सारखे सिनेमा बनवले आहेत. हा सिनेमा फ्लॉप गेला पण मला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले. यानंतर दुश्मन आणि जख्म सारख्या सिनेमांनी चांगला बिझनेस करुन दिला.    

ही गोष्ट फक्त सिनेमा निवडीपर्यंत मार्यादित नाही आहे. ज्यावेळी सनी लिओनीला अमेरिकेन इंडस्ट्रीने नाकारले होते तेव्हा पूजाची इच्छा होती तिने भारतीय सिनेमांमध्ये काम करावे. पूजा म्हणाली, मी सनीला भारतात आणले अमेरिकाने तिला मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये स्वीकारले नाही. सनी रिऑलिटी शो 'बिग बॉस 5'मध्ये सहभागी झाली होती. याशोनंतर तिच्या बॉलिवूड प्रवासाची दारं उघडी झाली.  सनीला ‘जिस्म2’ची आॅफर मिळाली  पुढे तिला एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस2’ही मिळाला. यानंतर शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून अनेक बिग बॅनरच्या चित्रपटात आयटम साँग करताना ती दिसली.   

पूजा भट्टबाबत बोलयाचे झाले तर ‘सडक2’मध्ये संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य राय कपूर आणि आलिया भट्ट अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. १९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.  यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. 

टॅग्स :पूजा भटसनी लिओनी