निशाला दत्तक घेताना सनी लिओनीने केली चूक; ३० दिवसांत द्यावे लागणार उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:07 IST
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिने अलीकडे लातूरमधील निशा नावाच्या चिमुकलीला दत्तक ...
निशाला दत्तक घेताना सनी लिओनीने केली चूक; ३० दिवसांत द्यावे लागणार उत्तर!
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिने अलीकडे लातूरमधील निशा नावाच्या चिमुकलीला दत्तक घेतले. ही चिमुकली निशा आता निशा कौर वेबर झाली आहे. निशाला मराठीशिवाय इंग्रजी वा हिंदी येत नाही आणि सनी व तिचा पती डेनियल वेबर या दोघांना मराठी येत नाही. त्यामुळे भाषेमुळे निशासोबत संवाद साधण्यात सनी व डेनियल दोघांनाही अडचणी येत होत्या. पण हळूहळू या अडचणी दूर होताना दिसताहेत. कारण चिमुकली निशा सनी व डेनियलसोबत चांगलीच रूळली आहे. पण आता निशाच्या दत्तक प्रक्रियेदरम्यान केलेली एक चूक सनीच्या अंगलट आलीय. होय, कथितरित्या दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी मुलीचा फोटो सोशल साईटवर पोस्ट केल्यामुळे सनीला कायदेशीर नोटीस जारी केली आहे. सोबतच दत्तक देणा-या संस्थेकडूनही (केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरण) उत्तर मागवले गेले आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास सचिवाकडून याबाबत रिपोर्ट मागवण्यात आला असल्याचे कळते. नियमानुसार, दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आपण दत्तक घेणा-या बाळाचे डिटेल्स सार्वजनिक करू शकत नाही. सनीने या नियमाचा भंग केल्याचे राष्ट्रीय बाल आयोगाचे मत आहे. दत्तक घेतलेल्या निशाचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी सनीची प्रशंसा केली होती. तर काही लोकांनी या मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंटही केल्या होत्या. बाल आयोगाचे सदस्य विभांशू जोशी यांनी याबाबत राष्ट्रीय बाल आयोगाकडे तक्रार केली होती. याचीही दखल आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी सनीला ३० दिवसांच्या आत उत्तर देण्याचे बजावण्यात आहे. आता या प्रकरणाला कसे वळण मिळते, ते बघूयात!!ALSO READ : सनी लिओनीची तान्हुली निशा अशी रमली डॅड डेनियल वेबरसोबत!असे झाले उल्लंघन...सनी लिओनीने ३० सप्टेंबर २०१६ रोजी केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर दत्तक प्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज केला होता. नियमानुसार, ३१ जून २०१७ रोजी निशा व सनीची मॅच मॅचिंग केले गेले. यानंतर कोर्टात दत्तक प्रक्रिया सुरु झाली. याचदरम्यान केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाने निशाला सनीच्या प्री-अॅडप्शन फास्टर केअरमध्ये दिले. निशा फास्टर केअरमध्ये असतानाच सनीने तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. हे निशाच्या खासगीपणाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.