Join us

​सनी लिओनीनंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात होऊ शकते ‘या’ पॉर्न स्टारची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 11:16 IST

सलमान खान सध्या ‘दस का दम’ हा टीव्ही शो होस्ट करतोय. यानंतर लवकरचं तो ‘बिग बॉस’चे नवे सीझन होस्ट ...

सलमान खान सध्या ‘दस का दम’ हा टीव्ही शो होस्ट करतोय. यानंतर लवकरचं तो ‘बिग बॉस’चे नवे सीझन होस्ट करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस’च्या या आगामी सीझनची म्हणजेच ‘बिग बॉस12’ची आत्तापासूनचं चर्चा आहे.  होय, यावेळचे हे सीझन कधी नव्हे इतके बोल्ड असणार असल्याची चर्चा आहे. आता याच चर्चेला साजेशी अशीच एक ताजी बातमी आहे. होय, सनी लिओनीनंतर ‘बिग बॉस12’मध्ये  एक नवी पॉर्न स्टार दिसू शकते. तिचे नाव काय तर शांती डायनामाइट. होय, शांती या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊ शकते.गेल्या अनेक सीझनसाठी शांतीचे नाव चर्चेत होते. मात्र ती चर्चा निव्वळ अफवा निघाली. पण या सीझनमध्ये ती येईल, याची शक्यता अधिक आहे. कारण या सीझनमध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सिअल जोड्या दिसणार आहेत. यापूर्वी पॉर्न स्टार सनी लिओनी बिग बॉसच्या घरात दिसली होती. यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळाले होते. घरात पाहुणे म्हणून गेलेले दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सनीला त्यांचा चित्रपट आॅफर केला होता. यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. आता सनी पॉर्न स्टार नाही तर बॉलिवूड अभिनेत्री म्हणून अधिक ओळखली जाते. तिने आपली जुनी ओळख कधीचीच मागे टाकली आहे.  ‘टेलीचक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे आगामी सीझन कमालीचे बोल्ड असणार आहे. ‘बिग बॉस११’चा टीआरपी फार चांगला नव्हता. ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनमध्ये ही कसर भरून काढण्याचे मेकर्सचे प्रयत्न असल्याचे कळतेय. यासाठी शोला बोल्डनेसचा तडका लावला जाणार असल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, या सीझनमध्ये स्पर्धक जोड्यांच्या रूपात ‘बिग बॉस’च्या घरात येणार. यातही वादग्रस्त स्पर्धक आणण्याचा मेकर्सचा विचार आहे. यात सासू सून, बॉस सेक्रेटरी, वादग्रस्त पत्रकार येऊ शकतात. ‘बिग बॉस’च्या सूत्रांचे मानाल तर गे आणि लेस्बियन कपलही या घरात दिसू शकतात. एवढेच नाही तर अ‍ॅडल्ट स्टार किंवा स्ट्रीपर्सचाही शोध सुरु आहे. आता ही बातमी खरी ठरली तर ‘बिग बॉस’चे हे आगामी सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरणार हे नक्की. आता यामुळे टीआरपी मिळतो की निव्वळ वाद रंगतात, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे.ALSO READ : शांतीने उडवली अनेकींची झोप...!