Join us  

सनी लिओनीनं मुंबईत खरेदी केलं ‘ड्रिम हाऊस’, किंमत जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 3:12 PM

बॉलिवूडमध्ये दशकभरापासून सक्रीय असलेली सनी लिओनी (Sunny Leone) दीर्घकाळापासून मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पण आता मुंबईत तिनं स्वत:चं अलिशान घर खरेदी केलं आहे.

Sunny Leone buys New Home : पॉर्न स्टार अशी ओळख असलेली सनी लिओनी (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच झाली. पॉर्न स्टार ही तिची ओळख कधीच मागे पडली आहे. आताश: ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. गेल्या 10 वर्षांत बॉलिवूडमध्ये तिने चांगलंच बस्तान बसवलं आहे. बॉलिवूडमध्ये दशकभरापासून सक्रीय असलेली सनी लिओनी दीर्घकाळापासून मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पण आता मुंबईत तिनं स्वत:चं अलिशान घर खरेदी केलं आहे. सनी लिओनीने मुंबईत  तीन बेडरूमचं भव्य पेंटहाउस खरेदी केलं आहे. एका रिपोर्टनुसार, सनीच्या या घराची  किंमत सुमारे 16 कोटी रुपये  आहे.

 मुंबईला घर खरेदी केल्यानंतर सनी जाम खूश आहे.  मुंबईत घर खरेदी करण्याच्या निर्णयावर ती म्हणते, ‘येथे घर घेण्याचा आमचा निर्णय भावनिक होता. आम्हाला तीन मुले आहेत आणि  आम्हाला आमच्या मुलांना अशी जागा द्यायची होती की त्यांना ते आवडेल.  तुम्ही आमच्या घरी आलात तर तुम्हाला दिसेल की आमचं अमेरिकन स्टाईलमध्ये बनवलेलं आहे.

सनी पुढे म्हणाली,  माझी मुलं  सध्या आनंदात आहेत. नव्या घराचा खूप आनंद घेत आहेत कारण त्यांना त्यांच्या बाईक चालवण्यासाठी आणि बागेत खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे. स्वीमिंग पूलसह इतर अनेक सुविधांवर काम सुरू आहे. आमचं घर हे पूर्ण सर्व्हिस अपार्टमेंट आहे. याठिकाणी मला माझ्याा मुलांची काळजी करण्याची गरज नाही.

मला माझं प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचं आहे...मी चित्रपटांत काम करतेय. माझी मेकअप लाईन आहे. क्लोदिंग लाइन आहे. स्वत:चं एक आॅफिस आहे. जिथे अनेक लोक काम करतात. मी फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतेय. माझं प्रत्येक स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, असंही सनी म्हणाली. 

टॅग्स :सनी लिओनी