Join us

आपल्या कामाची परिवाराला भनक लागू नये म्हणून सनी लिओनी खरेदी करायची मॅगझीन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 19:03 IST

पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये यशस्वी वाटचाल करीत असलेल्या लैला म्हणजेच सनी लिओनी हिने तिच्या आयुष्याशी संबंधित एका सीक्रेटचा नुकताच खुलासा ...

पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये यशस्वी वाटचाल करीत असलेल्या लैला म्हणजेच सनी लिओनी हिने तिच्या आयुष्याशी संबंधित एका सीक्रेटचा नुकताच खुलासा केला आहे. आपल्या हॉट अंदाज आणि कामामुळे इंडस्ट्रीतील सनसेशन बनत असलेली सनी सध्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. आतापर्यंत सनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिने जो खुलासा केला आहे तो खरोखरच धक्कादायक आहे. सनीने नेमका काय खुलासा केला याचाच आढावा आज आपण घेणार आहोत. वास्तविक सनीने केलेला खुलासा तिच्या कामासंदर्भातील आहे. जेव्हा ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करीत होती तेव्हा तिने तिच्या परिवारापासून एक बाब लपवून ठेवली होती. ही बाब लपवून ठेवण्यासाठी तिला बरीच धडपड करावी लागली. नुकतेच सनीने याबाबतचा खुलासा केला आहे. सनीने म्हटले की, माझे काम लपविण्यासाठी मला काय-काय करावे लागत असे? परिसरातील दुकानांमधून सगळे मॅगझीन कसे विकत घ्यावे लागत असे? याबाबतचा सर्व उलगडा केला आहे. सनीने म्हटले की, मी पेंटहाउस साप्ताहिकासाठी पहिल्यांदा पोज दिली होती, ही बाब माझ्या आई-वडिलांना माहिती नव्हती. कारण मी त्यांच्यापर्यंत हे साप्ताहिकच पोहचू दिले नाही. कारण मी माझ्या घराच्या आजूबाजूला असलेले सर्व साप्ताहिक खरेदी केले होते. मात्र जेव्हा मी पेंटहाउस साप्ताहिकाचा ‘पेंट आॅफ द इयर अवॉर्ड’ जिंकला तेव्हा माझे आई-वडील खूश होतील असे मला वाटले. मात्र यावर मला सुरुवातीला प्रतिक्रिया दिली नाही. बराच वेळ माझी आई शांत उभी होती. काही वेळानंतर तिने मला म्हटले की, ‘तू आईकरिता नेकेड झाली’ तर पप्पांनी म्हटले ‘तू आम्हाला याबाबत का विचारले नाही? आयुष्यात तुला जे करायचे ते चांगले कर’सनी उर्फ करनजीत कौर वोहरा हिला पेंटहाउस साप्ताहिकाच्या ‘कव्हर आॅफ द इयर’ या अवॉर्डसाठी एक लाख डॉलर मिळाले होते. त्यानंतर सनीने धाडस करीत तिच्या आई-वडिलांना स्पष्ट शब्दात मला ‘पॉर्न स्टार’ बनायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिचा पॉर्न स्टार म्हणून प्रवास सुरू झाली. बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिने ‘बिग बॉस’ या शोचा आधार मिळवला. २००५ मध्ये ती ‘कलयुग’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार होती. परंतु तिने या भूमिकेसाठी दहा लाख डॉलरची मागणी केल्याने हा चित्रपट तिच्या हातातून गेला होता.