Join us  

Sunny Leone Birthday Special : सनी लियोनीचे हे फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:44 PM

सनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोंची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. इन्स्टाग्रावर तिचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात.

ठळक मुद्देसनीचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात फॅन असून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर 21.4 दक्षलक्ष फॉलोव्हर्स असून ती तिच्या फॉलोव्हर्ससाठी नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

पॉर्न एक्ट्रेस ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लियोनीच्या हॉटनेसचे जगभरात अनेक चाहते आहेत. सनी लिओनीचा आज म्हणजेच १३ मे ला वाढदिवस असून तिचे खरे नाव करणजीत कौर वोहरा असे आहे. सनीने आज बॉलिवूडमध्ये तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. तिचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात फॅन असून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर 21.4 दक्षलक्ष फॉलोव्हर्स असून ती तिच्या फॉलोव्हर्ससाठी नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

सनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोंची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. इन्स्टाग्रावर तिचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद देखील मिळतो.

कॅनडातील शिख कुटुंबात सनी लियोनीचा जन्म झाला. इंटरनेटवर ‘मोस्ट सर्च्ड पीपल’च्या यादीत स्थान मिळवणारी सनी सुमारे ८२.२० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे अनेक महागड्या अलिशान गाड्या आहेत. एका चित्रपटासाठी सनी ४.५ कोटी रूपये घेते, असे म्हटले जाते. 

खरे तर सनी लिओनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले होते. या बेकरीत तिला प्रचंड मेहनत करावी लागत असे. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब केला होता.

बेकरीत काम करत असताना सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे कशी वळली, याचीही एक कथा आहे. सनीची एक मैत्रीण खूप चांगली डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची ओळख करून दिली.

त्यानंतरच सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी सनी बॉलिवूडकडे वळली. आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. ती सध्या एका दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण करत असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

 

टॅग्स :सनी लियोनी