Join us

सनी देओलने आजीबरोबरचा लहानपणीचा फोटो केला शेअर; लहानपणी असा दिसायचा सनीपाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 19:29 IST

बॉलिवूडमध्ये डॅशिंग अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल लहानपणी कसा दिसत असेल? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ...

बॉलिवूडमध्ये डॅशिंग अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल लहानपणी कसा दिसत असेल? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला त्याचा एक फोटो दाखविणार आहोत. होय, फोटो बघून तुमचा अजिबातच विश्वास बसणार नाही की, चित्रपटात दिसणारा डॅशिंग सनीपाजी हाच काय? असो, सनी देओलनीच याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये तो त्याच्या आजीसोबत बसलेला दिसत आहे. फोटोमध्ये हाफ पॅण्ट आणि टी-शर्टवर दिसत असलेला सनी खूपच गोंडस आहे. अर्थात हा त्याचा लहानपणीचा लूक आहे. दरम्यान, सनी देओलने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये  'My grandmom and I. She was and is my everything, because of her I will never hurt anyone. #mylove #myangel #grandmother' असे लिहिले आहे. सध्या सनी मुलगा करण देओलच्या लॉन्चिंग चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करीत आहे. करण ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग मनाली येथे सुरू असून, त्यासाठी सनी देओल स्वत:हून यात लक्ष घालत आहे. त्याव्यतिरिक्त तो इतरही काही प्रोजेक्टवर काम करीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सनी देओलचा डिम्पल कपाडियाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये सनी आणि डिम्पल लंडनमधील एका स्टॉपवर हातात हात घालून बसलेले दिसत होते. जेव्हा हा फोटो समोर आला तेव्हा एकच खळबळ उडाली होती. त्याचबरोबर सनी देओल आणि डिम्पलमधील लव्हस्टोरीला पुन्हा एकदा उजाळाही मिळाला होता. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच यांचा एक व्हिडीओही समोर आला होता. केआरकेने हा व्हिडीओ शेअर करताना सनीपाजीला चांगलेच डिवचले होते.