Join us  

'गदर २' हिट होताच तारा सिंगचा बदलला अ‍ॅटिट्यूड; सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 3:56 PM

सनी देओलचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो सेल्फी घ्यायला काम करायला आलेल्या चाहत्यावर भडकलेला दिसतोय.

सनी देओलचा गदर २ देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.  याच दरम्यान सनी देओलचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो एअरपोर्टवर दिसतोय. यात तो चाहत्यावर चिडलेला दिसतोय. 

हा व्हिडिओ विमानतळावरील आहे. सनी एअरपोर्टवर ग्रे मॅचिंग शर्ट आणि ट्राउजरमध्ये दिसत आहे. सनीला पाहताच एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावत येतो. सनीही थांबला पण जेव्हा तो सेल्फी घेत होता तेव्हा सनी त्याच्यावर ओरडताना दिसला आणि तो तिथून निघून गेला.

सनी देओल विमानतळाच्या बाहेर पडत असताना एक चाहता सेल्फी घेण्यासाठी धावत येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अभिनेत्याचे अंगरक्षकही चाहत्याला थांबवतात पण कसा तरी तो सनीसोबत फोटो काढण्यात यशस्वी होतो. पण व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फॅनसोबत फोटो काढत असताना सनी त्याच्यावर भडकताना दिसत आहे. 

सनीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, आम्ही तुमचा आदर करायचा, पण तुम्ही लोकांसोबत चुकीच्या पद्धतीने वागलात तर ते वाईट आहे. दुसऱ्याने लिहिले, पाजींना राग आला, आणखी एकाने लिहिले,  'जर त्याला चाहत्यांचा आदर करत येत नसेल तर लोक त्याचे चित्रपट पाहायला का जातात?' 

 काही दिवसांपूर्वीच देखील असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाले होता. यात सनी देओलसोबत एक पोलीस हात मिळवायला परंतु, सनी त्याला हात न मिळवताच पुढे जातो. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

 

टॅग्स :सनी देओल