Join us  

बॉर्डरमधील सुनील शेट्टीची नायिका आता दिसते अशी, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 7:32 PM

सुनील शेट्टी आणि शरबानी मुखर्जी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ए जाते हुए लम्हे हे गाणे चांगलेच गाजले होते.

ठळक मुद्देशरबानीला नुकतेच जुहू येथील दुर्गा पूजेला काजोल, तनिषा आणि तनुजा यांच्यासोबत पाहाण्यात आले. त्यावेळी तिने छानसी साडी नेसली असून ती खूपच सुंदर दिसत होती.

जे पी दत्ता यांच्या बॉर्डर या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या चित्रपटातील सगळीच गाणी देखील प्रचंड गाजली होती. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, पूजा भट, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात सुनीलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? या अभिनेत्रीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. ही अभिनेत्री बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील असून गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे.

सुनील शेट्टी आणि शरबानी मुखर्जी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ए जाते हुए लम्हे हे गाणे चांगलेच गाजले होते. हे गाणे, या गाण्यातील नायिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. बॉर्डर या चित्रपटात शरबानी खूपच छान दिसली होती. तिच्या सौंदर्याची त्याकाळात प्रचंड चर्चा झाली होती. पण त्यानंतर ती केवळ काही दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकली. शरबानी ही प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांची चुलत बहीण असून ती आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिला नुकतेच जुहू येथील दुर्गा पूजेला काजोल, तनिषा आणि तनुजा यांच्यासोबत पाहाण्यात आले. त्यावेळी तिने छानसी साडी नेसली असून ती खूपच सुंदर दिसत होती. पण गेल्या काही वर्षांत शरबानीमध्ये खूपच फरक पडला आहे. यावेळी शरबानीसोबत तिचा भाऊ सम्राट मुखर्जी देखील होता. त्याने देखील काही बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांने राम और श्याम या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयसृष्टीला सुरुवात केली होती.  

 

शरबानी चित्रपटांसोबतच घर आज सोनिया या प्रसिद्ध अल्बममध्ये देखील दिसली होती. शरबानीचा पहिला मल्याळम चित्रपट बनवल्यानंतर तो प्रदर्शित व्हायला जवळजवळ सात वर्षं लागले होते. शरबानीला हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अधिक लोकप्रियता मिळाली. 

टॅग्स :सुनील शेट्टीकाजोलराणी मुखर्जीसीमारेषा