Join us

सुनील पाल होणार 'घरजावई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:44 IST

'सुनील पाल' कोण आठवला का? द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज २00५ च्या सिझनचा विजेता ठरलेला आणि त्यानंतर अनेक हिंदी ...

'सुनील पाल' कोण आठवला का? द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज २00५ च्या सिझनचा विजेता ठरलेला आणि त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या अफलातून विनोदी अभिनयानं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता सुनील पाल लवकरच 'फॅमिली ४२0' या आगामी विनोदी चित्रपटातून पुन्हा एकदा हसविण्यासाठी येत आहे.या चित्रपटात एका घरजावयाच्या भूमिकेमध्ये त्याचे दर्शन घडणार आहे. लावण्य प्रॉडक्शन्स अँंड क्रिएशन्स व देव राज निर्मित 'फॅमिली ४२0' या चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष गायकवाड यांचे आहे.