Join us  

राजकारण्यांनीच ही वेळ आणली...! श्वासासाठी तडफडत असलेले लोक पाहून ‘अण्णा’ भडकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:13 PM

रोज होणारे हजारो मृत्यू, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी वणवण भटकत असलेले कोरोना रूग्णांचे कुटुंबीय ही भीषण चित्र पाहून सुनील शेट्टी संतापला...

ठळक मुद्देसुनील शेट्टी सध्या कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर एक मोहिम सुरु केली आहे.  मोहिमेच्या अंतर्गत तो लोकांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करुन देत आहे.

अख्खा देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात सापडला आहे. (Second Wave Of Corona Virus)  कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन नाही, रूग्णालयात बेडस नाहीत, औषधे नाहीत अशा स्थितीत सामान्यजन हवालदिल झाले आहे. अनेकांनी या स्थितीसाठी राजकारण्यांना जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला आहे. आता बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty) राजकारण्यांना फैलावर घेतले आहे.

रोज होणारे हजारो मृत्यू, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी वणवण भटकत असलेले कोरोना रूग्णांचे कुटुंबीय ही भीषण चित्र पाहून अण्णा  भडकला आणि राजकारण्यांवर त्याने चांगलेच तोंडसुख घेतले.एका ताज्या मुलाखतीत सुनील शेट्टीने या परिस्थितीसाठी राजकारण्यांना जबाबदार ठरवले. राजकारण्यांनी त्यांचे काम चोख बजावले असते तर आज लोकांवर ही वेळ आली नसती. त्यांना उपचारासाठी वणवण भटकावे लागले नसते. खुर्चीवर बसणारे राजकारणी पुढच्या पाच वर्षात माया कशी जमावायची याचा विचार करता. देशासाठी काय करायचे, याचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. यांना आपणच निवडून दिले आणि आज यांच्याच मुळे आपल्यावर बेड्स, ऑक्सिजनसाठी भटकण्याची वेळ आलीये. यांच्यामुळेच ही स्थिती उद्भवलीये. पण काळ बदलतो तसेच सत्तेच्या सिंहासनावर बसलेले हे लोकही बदलतील, असे अण्णा म्हणाला.राजकारणात अद्यापही काही चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. अशा चांगल्या लोकांना निवडून द्या. तुमच्यासाठी कष्ट घेणा-यांना सत्तेत आणा, असे आवाहनही त्याने यावेळी केले.

 राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नाही...देशात भयंकर स्थिती आहे़ आपण सर्वच कठीण परिस्थितीतून जात आहोत. ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे. एकमेकांवर आरोप करण्याची नाही, असेही सुनील शेट्टी म्हणाला. सुनील शेट्टी सध्या कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर एक मोहिम सुरु केली आहे.  मोहिमेच्या अंतर्गत तो लोकांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करुन देत आहे.

 

टॅग्स :सुनील शेट्टीकोरोना वायरस बातम्या