रणबीरमुळे कॅटने नाकारला ‘सुल्तान’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 22:59 IST
आपल्याला तर माहितीच आहे की, सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी विशेष मेहनत घेत आहे. यात सलमानने ...
रणबीरमुळे कॅटने नाकारला ‘सुल्तान’ ?
आपल्याला तर माहितीच आहे की, सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी विशेष मेहनत घेत आहे. यात सलमानने पहलवानाची भूमिका केली असून चित्रपटाच्या टीमला अखेरपर्यंत हिरोईनच मिळत नव्हती.शेवटी, कंटाळून अनुष्का शर्माला त्यांना चित्रपटाची हिरोईन म्हणून घ्यावे लागले. ती देखील चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. पण, अनुष्काला विचारण्यापूर्वी म्हणे कॅटरिनालाही टीमकडून विचारण्यात आले होते. तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरला ती सलमानसोबत काम करून नाराज करू इच्छित नव्हती म्हणून तिने सुल्तान साठी नकार दिला होता. तेव्हा ती रणबीरसोबत डेटवर जात होती.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरच एकमेव कारण आहे सलमानसोबत काम न करण्याचं.’ खरंतर, कॅटरीनाचा निर्णय योग्यच वाटतो. ती देखील फार काही खुश नव्हती जेव्हा रणबीर दीपिका पदुकोनसोबत ‘तमाशा’ साठी काम करत होता. तेव्हापासून कॅटरिना आणि रणबीर यांचा ब्रेक-अप व्हायला सुरूवात झाली होती.