सुहाना, खूप उत्तम अभिनेत्री बनेल; शबाना आझमींचे भाकित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 16:29 IST
मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागतात, म्हणतात ना. तसेच काहीसे शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाबद्दल म्हणावे लागले. हे आम्ही नाही ...
सुहाना, खूप उत्तम अभिनेत्री बनेल; शबाना आझमींचे भाकित!
मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागतात, म्हणतात ना. तसेच काहीसे शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाबद्दल म्हणावे लागले. हे आम्ही नाही तर बडे बडे स्टार सुहानाचे कौतुक करताना थकत नाहीयेत. होय, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, यांनी सुहानाचे टॅलेंट चांगलेच ओळखले आहे. केवळ ओळखलेच पाही तर सुहानाची मुक्तकंठे प्रशंसा पण केलीय. होय, शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत शबाना यांनी वर्तवले आहे. }}}} ‘माझे शब्द लक्षात ठेव. सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’ असे टिष्ट्वट शबाना यांनी शाहरूखला उद्देशून केले आहे. आता शबाना आझमी आपल्या लेकीविषयी असे काही बोलतात म्हणजे काय? कुठल्याही बापाचा ऊर भरून येणारचं ना? झालेही तसेच शाहरूखचा ऊर भरून आला. इतका की, त्याला शब्दचं सुचेनात. ‘तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुमच्या या विश्वासानंतर नक्कीच छोटीला प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत त्यांनी शबानांचे लिहिले. }}}}आज बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणून नावाजल्या जाणारा आमिर खानचीदेखील शबाना यांनी एकेकाळी प्रशंसा केली होती. आमिर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने एक लघुपट केला होता. हा लघुपट फार कमी जणांनी पाहिला होता. हा लघुपट पाहिलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे शबाना आझमी. त्यावेळी तो एक चांगला अभिनेता होणार, असे शबाना यांनी म्हटले होते. सुहानाने तिच्या शाळेत झालेल्या नाटकात सहभाग घेतला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून तिच्या अभिनय कौशल्याची झलक सर्वांनाच दिसली होती.