नातेवाइकाच्या लग्नसमारंभात दिसला सुहाना खानचा गॉर्जियस लूक, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो!
नातेवाइकाच्या लग्नसमारंभात दिसला सुहाना खानचा गॉर्जियस लूक, पाहा फोटो!
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो!१७ वर्षीय सुहानाने वेडिंग फंक्शनमध्ये लाइट ग्रीन कलरचा लहंगा परिधान केला होता. मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. सुहानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या लग्नाच्या वेगवेगळ्या समारंभात सुहाना डिफरेंट लूकमध्ये बघावयास मिळाली. एका समारंभात ती फ्लोरल प्रिंटचा लहंगा परिधान करून बघावयास मिळाली. तसेच मरून कलरच्या लहंगामध्येही सुहाना दिसली. सुहानाने या लग्न समारंभातील बरेचसे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले. सुहानाने शेअर केलेल्या बºयाचशा फोटोमध्ये ती फ्रेंड्स आणि नातेवाइकांसोबत बघावयास मिळत आहे. एका फोटोमध्ये ती मॉम गौरी खानसोबतही बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुहानाने तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे ती ट्रोल झाली होती. मम्मी गौरी खाननेच तिचे हे फोटो शेअर केले होते.