Join us

‘वेलकम बॅक’च्या यशाने नडियालवाला आनंदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:36 IST

नि र्माता फिरोज नादीयाडवाला त्याच्या 'वेलकम बॅक' ला मिळालेल्या यशाने आनंदात आहे. या यशामुळे प्रेरित होऊन फिरोज सध्या त्याचा ...

नि र्माता फिरोज नादीयाडवाला त्याच्या 'वेलकम बॅक' ला मिळालेल्या यशाने आनंदात आहे. या यशामुळे प्रेरित होऊन फिरोज सध्या त्याचा २00२ साली प्रदर्शित झालेला 'आवारा पागल दिवाना' या चित्रपटाचाही सिक्वेल बनवण्याचा विचार क रत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजने त्याचा परम मित्र अक्षयकुमारशी याबाबत चर्चा केली आहे. अक्षयकडून सकारात्मक उत्तर येईल अशी शक्यता आहे. अक्षय सोबतच सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिव्हर या कलाकारांनाही या चित्रपटात घेण्यास फिरोज उत्सुक आहे.