Join us  

‘स्ट्रिट डान्सर 3’बद्दल रेमो डिसूजाने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:03 PM

रेमो डिसूजाच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाच्या तारखेचाही खुलासा झालाय. रेमोच्या या चित्रपटाचे नाव आहे,‘स्ट्रिट डान्सर 3’.

ठळक मुद्दे२०१३ मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील डान्सर्सला घेऊन रेमोने ‘एबीसीडी’(एनीबडी कॅन डान्स) बनवला होता. २०१५ मध्ये रेमो ‘एबीसीडी2’ घेऊन आला होता

रेमो डिसूजाच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाच्या तारखेचाही खुलासा झालाय. रेमोच्या या चित्रपटाचे नाव आहे,‘स्ट्रिट डान्सर 3’. याचवर्षी ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटात वरूण धवनश्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. साहजिकचं चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द रेमोने ‘स्ट्रिट डान्सर 3’बद्दल एक मोठा खुलासा केलाय. आत्तापर्यंत ‘स्ट्रिट डान्सर 3’ हा रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा सीक्वल आहे, असेच सगळे मानून चालले होते. पण रेमोने मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.  ‘एबीसीडी’प्रमाणेच ‘स्ट्रिट डान्सर 3’ही एक डान्स मुव्ही आहे. पण ‘एबीसीडी’सीरिजचा सीक्वल मात्र अजिबात नाही. या चित्रपटाची कथा एकदम वेगळी आहे. ‘एबीसीडी’शी त्याचा काहीही संबंध नाही, असे रेमोने ताज्या मुलाखतीत सांगितले.

 २०१३ मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील डान्सर्सला घेऊन रेमोने ‘एबीसीडी’(एनीबडी कॅन डान्स) बनवला होता. २०१५ मध्ये रेमो ‘एबीसीडी2’ घेऊन आला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होते. आता रेमो वरूण व श्रद्धाच्याच जोडीसह  ‘स्ट्रिट डान्सर 3’घेऊन येतो आहे.

बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे. या सिनेमात वरूण-श्रद्धासोबत नोरा फतेही लीड रोलमध्ये आहे. सिनेमात श्रद्धा भारतीय डान्सरची भूमिका साकारणार आहे तर नोरा इंटरनॅशनल डान्सरच्या भूमिकेत दिसेल. सिनेमात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच.

टॅग्स :रेमो डिसुझावरूण धवनश्रद्धा कपूर