Join us  

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 11:05 AM

  रियाला विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न  

ठळक मुद्दे सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करणा-या ईडीला रिया व शौविक यांच्या फोनमधून काही संशयास्पद चॅट मिळाले होते.

सुशांत सिंग राजपूतप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर काल शनिवारी एनसीबीने सुशांतचा स्टाफ दीपेश सावंतला अटक केली. काल रात्रभर सुशांतची चौकशी झाली. सूत्रांचे मानाल तर या चौकशीदरम्यान दीपेशने काही धक्कादायक खुलासे केलेत. रियाच्या इशा-यावरूनच सुशांतच्या घरी ड्रग्ज मागवली जायची, असे दीपेशने सांगितल्याचे कळते. दीपेशच्या जबाबानंतर एनसीबीची टीम कुठल्याहीक्षणी रियाला अटक करू शकते.एनसीबीने याआधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली आहे. सॅम्युअल मिरांडा यानेही रियाच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीला दिली आहे. शौविकने बहिण रियाच्या काही रहस्यांवरून पडदा हटवला आहे.सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करणा-या ईडीला रिया व शौविक यांच्या फोनमधून काही संशयास्पद चॅट मिळाले होते. यातून ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यावर ईडीने हे चॅट सीबीआय व एनसीबीशी शेअर केले होते. ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तातडीने कारवाई करत 3 ड्रग्ज पेडलर्ससह एकूण 6 जणांना अटक केली होती.आज रविवारी सकाळी एनसीबीने रिया चक्रवर्तीच्या घरी जात तिला चौकशीसाठी समन्स बजावला.ज्या आधारावर रियाचा भाऊ शौविकला एनसीबीने अटक केली, त्याच आधारावर रियालाही अटक होऊ शकते.

  रियाला विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न  

- सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज घ्यायचा का?- सुशांतसोबत तू सुद्धा ड्रग्ज घ्यायची का?- तुम्हाला ड्रग्ज कोण द्यायचे?- 2017 मध्ये तू ड्रग्ज घेतले होते का?- तू का आणि कोणासोबत ड्रग्जबद्दल चर्चा करायचीस?- सुशांत ड्रग्ज घ्यायचा, हे तुझ्याशिवाय अन्य कोणाला ठाऊक आहे?- सप्लायर्सकडून ड्रग्ज कोण खरेदी करायचे?- तू सुशांतला ड्रग्ज घेण्यासाठी विवश केलेस?- सुशांत कधी ड्रग्जचा ओव्हरडोज घ्यायचा का? असे असेल तर कधी?- सुशांत ड्रग्ज घ्यायचा, याची माहिती तू त्याच्या कुटुंबाला दिली होतीस का?- तुझी व्हॉट्सअ‍ॅप चॅट कशाबद्दल आहे? बासित आणि जैद यांच्याशी तू शौविकच्या माध्यमातून भेटली होतीस का?- सुशांतच्या वांद्रे येथील घरी तू ड्रग्ज घेऊन आली होतीस, असे दीपेशने सांगितले आहे़ हे खरे की खोटे?- औषधांसोबत ड्रग्ज घेतल्याने सुशांतची प्रकृती अधिक ढासळू शकते, याची तुला कल्पना होती का? 

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत