शाहरुखचे प्रेम 'हार्ले डेव्हीडसन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:29 IST
सु परस्टार शाहरुख खानला मागच्याच आठवड्यात चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने 'हार्ले डेव्हीडसन' भेट दिली. 'दिलवाले' च्या शूटिंगसाठी सेटवर या ...
शाहरुखचे प्रेम 'हार्ले डेव्हीडसन'
सु परस्टार शाहरुख खानला मागच्याच आठवड्यात चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने 'हार्ले डेव्हीडसन' भेट दिली. 'दिलवाले' च्या शूटिंगसाठी सेटवर या गाडीनेच जायला शाहरुखला आवडते. बाईकवर फिरल्याने माझे मन आणि केस दोन्हीही मोकळे होत असल्याचे शाहरुखने मिश्कीलपणे हसत सांगितले. ४९ वर्षीय शाहरुखने नुकताच त्याचा या बाईक सोबतचा फोटोही ट्विट केला आहे. रोहित सोबत शाहरुखचा हा दुसरा चित्रपट असून यापूर्वी त्यांनी 'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये सोबत काम केले आहे. १८ डिसेंबरला प्रदर्शित होत असणार्या या चित्रपटात शाहरुखसोबत काजोल, वरूण धवन, कृती सेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.