एसआरके झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 20:55 IST
किंगखान शाहरूख खान आपल्या मुलांवर किती पे्रम करतो, हे जगजाहिर आहे. शाहरूख आर्यन, अबराम आणि मुलगी सुहाना अशा तीन ...
एसआरके झाला भावूक
किंगखान शाहरूख खान आपल्या मुलांवर किती पे्रम करतो, हे जगजाहिर आहे. शाहरूख आर्यन, अबराम आणि मुलगी सुहाना अशा तीन मुलांचा बाप आहे. केवळ बाप नाही तर एक जबाबदार बाप आहे. त्याच्या ताज्या टिष्ट्वट वरून बाप म्हणून तो किती जबाबदार आहे, हे स्पष्ट झाले. पालकत्व म्हणजे काय, पिता होणे म्हणजे काय, हे शाहरूखने अतिशय समर्पक शब्दांत लिहिले. त्याने लिहिले, पितृत्व म्हणजे दुसºयाच्या माध्यमातून चालणारा स्वत:चा प्रवास आहे. ते तुमचे अपयश, भीती, प्रेम करण्याची आणि ते निभवण्याची क्षमता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यागाची भावना उजागर करते....व्वा शाहरूख, मान गयें बाप!!