Join us  

श्रीदेवींच्या ऑनस्क्रीन मुलीने केला पाकिस्तानी अभिनेत्यासोबत साखरपुडा, शेअर केला रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 6:02 PM

बॉलिवूड 'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारलेल्या सजल अलीने साखरपुडा केला आहे.

ठळक मुद्देसजल अभिनेता अहद रजा मीरला गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत होतीसजल अलीने शेअर केलेल्या फोटोत हे कपल खूपच रोमाँटिक अंदाजात दिसतेय

बॉलिवूड 'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारलेल्या सजल अलीने साखरपुडा केला आहे. बॉयफ्रेंड अहद रजा मीरसोबत तिने साखरपुडा केल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले आहे. साखरपुड्यातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सजल अभिनेता अहद रजा मीरला गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत होती. आता दोघांनी आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेलं आहे.

 

सजल अलीने शेअर केलेल्या फोटोत हे कपल खूपच रोमाँटिक अंदाजात दिसतेय. सजलने पीच कलरचा लेंहगा परिधान केला आहे. सजलने या फोटोला एक कॅप्शनदेखील दिले आहे, ''आज आयुष्याची एक नवी सुरुवात केली. आम्ही आनंदीत आहोत की कुटुंबीयांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत.   

सजल अलीने अहद रजा मीरसोबत स्क्रिन शेअर केली आहे. दोघांनीही पाकिस्तानी टिव्ही सीरियल 'आंगन' आणि 'यकीन' मध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. 2017मध्ये आलेल्या 'मॉम'मध्ये अभिनेत्री सजल अलीमे श्रीदेवी यांच्या सावत्र मुलीची भूमिका साकारली होती. यात श्रीदेवी आणि सजलशिवाय अक्षय खन्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका होत्या. सजलने याआधी 2016मध्ये आलेल्या जिंदगी कितनी हसीन है मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.     

टॅग्स :श्रीदेवी