आर्थिक स्थिती खालावल्याने चिंतेत होत्या श्रीदेवी! काका वेणुगोपाल रेड्डी यांचा धक्कादायक खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 11:39 IST
बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवींच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही बॉलिवूड आणि चाहते सावरलेले नाहीत. याचदरम्यान श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी धक्कादायक ...
आर्थिक स्थिती खालावल्याने चिंतेत होत्या श्रीदेवी! काका वेणुगोपाल रेड्डी यांचा धक्कादायक खुलासा!!
बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवींच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही बॉलिवूड आणि चाहते सावरलेले नाहीत. याचदरम्यान श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, वेणुगोपाल रेड्डी यांनी एका तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेत. श्रीदेवींच्या आयुष्यात प्रचंड दु: होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. ‘श्रीदेवी सगळ्यांसमोर हसत राहायची. पण आतून ती प्रचंड दु:खात होती. हेच दु:ख आणि अपार वेदना घेऊन ती या जगातून गेली. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचा बराच मोठा पैसा चित्रपट न चालल्याने डुबला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि नवा पैसा उभा करण्यासाठी बोनी कपूर यांनी श्रीदेवीची बरीच प्रॉपर्टी विकली. प्रॉपर्टी विकली गेल्याने आणि आर्थिक स्थिती ठीक नसल्याने श्रीदेवी कायम चिंतीत असायची. श्रीदेवीने दुसºयांदा काम सुरू केले, याचे कारणही बोनी कपूर हेच होते. कुटुंबाला सांभाळण्यासाठीच श्रीदेवींनी दुसरी इनिंग सुरु केली. या चिंतेमुळे मृत्यूनंतरही तिच्या जीवाला शांती मिळू शकणार नाही,’ असे वेणुगोपाल यांनी म्हटले.ALSO READ : आईच्या निधनाचे दु:ख गिळून कामावर परतली जान्हवी कपूर! पाहा, ‘धडक’च्या सेटवरचे फोटो!!यापूर्वी बॉलिवूडचे दिग्दर्शक रामगोपाल चर्मा यांनीही श्रीदेवींबद्दल असाच काही खुलासा केला होता. फेसबुकवर श्रीदेवींच्या चाहत्यांना उद्देशून लिहिलेल्या एका खुल्या पत्रात त्यांनी श्रीदेवींबद्दलच्या अनेक आठवणी लिहिल्या होत्या. श्रीदेवी या जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती, असे त्यांनी यात लिहिले होते. ‘श्रीदेवी एक हरहुन्नरी अभिनेत्री होती. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार होती. पण तिच्या आयुष्याचा हा केवळ एक पैलू होता. अनेकांसाठी तिचे आयुष्य परफेक्ट होते. सुंदर चेहरा, प्रतिभा, दोन सुंदर मुलींसह हसते खेळते कुटुंब...बाहेरून सगळे असे सुंदर दिसायचे. पण वास्तव याच्या विपरित होते. ‘क्षण क्षणम’ या चित्रपटापासून मी श्रीदेवीला ओळखतो. पित्याच्या मृत्यूपर्यंत तिचे आयुष्य आकाशात उडणाºया एखाद्या स्वतंत्र पक्ष्यासारखे होते. पण यानंतर हा पक्षी बंदिस्त झाला. एका महिलेच्या शरिरात कैद असलेल्या मुलासारखी ती होती. व्यक्ती म्हणून ती निष्पाप होती. पण अनेक वाईट अनुभवांमुळे ती मनातून पार कोमेजली होती. जिवंत असताना तिला कधीच शांती लाभली नाही. ती जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती’, असे रामगोपाल वर्मा यांनी लिहिले होते.