Join us  

‘वन डे’ची तयारी, ईशा गुप्तासाठी उभारले खास जिम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 6:00 AM

होय, या दिवसांत ईशा तिच्या भूमिकांबद्दल कमालीची चोखंदळ झालीय आणि पडद्यावरच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्यासाठी ती जीवाचे रान करतेय. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल.

ठळक मुद्दे२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. 

सोशल मीडियावर स्वत:चे सिजलिंग फोटो शेअर करून कायम चर्चेत राहणारी ईशा गुप्ता हिच्यातील एक बदल कदाचित तुमच्या लक्षात आला नसेल. होय, या दिवसांत ईशा तिच्या भूमिकांबद्दल कमालीची चोखंदळ झालीय आणि पडद्यावरच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्यासाठी ती जीवाचे रान करतेय. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही हे पटेल.लवकरच ईशा ‘वन डे’ या अ‍ॅक्शन ड्रामात दिसणार आहे. यात ईशा एका तडफदार महिला अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना कुठलीही कसूर राहू नये, यासाठी ईशा सध्या झटतेय. ऐकून आश्चर्य वाटेल पण, यामुळेच ‘वन डे’च्या सेटवर ईशासाठी एक खास जिम उभारण्यात आले आहे.

जिमचा अन् भूमिकेचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर आहे. ईशाच्या मते, पोलिस अधिका-याच्या भूमिकेत ती अगदी फिट दिसायला हवी. फिट बसायला हवी आणि त्यासाठीही बॉडीचा शेप जराही बिघडू नये, याकडे तिचा कटाक्ष आहे.

आत्तापर्यंत ईशाला बॉलिवूडची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखले जायचे. या भूमिकेनंतर कदाचित  गंभीर भूमिकांसाठी ईशा ओळखली जाईल, असे दिसतेय. किमान ईशाच्या मेहनतीवरून तरी हेच दिसतेय.यापूर्वी प्रकाश झा यांच्या २०१२ साली आलेल्या ‘चक्रव्युह’ या चित्रपटात ईशाने महिला पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसली होती.   ‘वन डे’ हा चित्रपट अशोक नंदा दिग्दर्शित करत आहेत२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.  

टॅग्स :ईशा गुप्ता