Join us

​साऊथची ‘सनसनी’ रायलक्ष्मीचा बोल्ड अवतार! पाहा, ‘जुली२’चा HOT टीजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 12:49 IST

सन २००४ मध्ये आलेला ‘जुली’ हा चित्रपट कदाचित तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा सेकंड पार्ट येतोय. होय, ‘जुली2’ येतोय आणि केवळ येतचं नाहीयं, तर आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे.

सन २००४ मध्ये आलेला ‘जुली’ हा चित्रपट कदाचित तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा सेकंड पार्ट येतोय. होय, ‘जुली2’ येतोय आणि केवळ येतचं नाहीयं, तर आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. ‘जुली’मध्ये नेहा धूपिया लीड रोलमध्ये दिसली होती. नेहाची जागा आता साऊथची हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री राय लक्ष्मी (लक्ष्मी राय)हिने घेतली आहे. ‘जुली2’च्या टीजरमध्ये तिचा हाच हॉट आणि बोल्ड अवतार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीजर ट्रेलरमध्ये चित्रपटातील ‘ओ जुली’ या गाण्याचे स्वर ऐकायला येत आहे.राय लक्ष्मी यात हॉट बिकनी ड्रेसमध्ये दिसतेय.‘जुली2’ येत्या ४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात हॉटनेस आणि बोल्डनेस असा सगळा मसाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे.  हॉटनेसचा हा तडका लावणारी राय लक्ष्मी एक प्रसिद्ध मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. केवळ एवढेच नाही तर कॅप्टन कूल महेन्द्रसिंह धोनी याची एक्स-गर्लफ्रेन्ड म्हणूनही ती ओळखली जाते. २००८ च्या आयपीएलदरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरले होते. त्यादिवसांत दोघेही लग्न करणार, अशाही बातम्या आल्या होत्या. अर्थात हे रिलेशन फार काळ चालू शकले नाही. मी व धोनी एकमेकांना डेट करत होतो, असा दावा खुद्द राय लक्ष्मीनेच केला होता. अर्थात धोनीने यावर चूप राहणे पसंत केले.  मध्यंतरी लक्ष्मीच्या आयुष्यात सध्या एक नवी व्यक्ती आल्याची चर्चाही होती. ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूड कोरिओग्राफर आणि मॉडेल हनीफ हिलाल. हनीफला लक्ष्मी डेट करत असल्याची खबर  होती. हनीफने आपले नाव बदलून वीर आर्यन केले आहे. वीर आर्यन याचे नाव लक्ष्मीच्या आधी पूजा बेदी आणि करिश्मा तन्ना या दोघींसोबतही जोडले गेले होते.