Join us  

अभिनेत्रीच्या खऱ्याखुऱ्या डिलीव्हरीचे करण्यात आले होते चित्रीकरण, चित्रपटात वापरला होता हा सीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:18 PM

या अभिनेत्रीच्या डिलीव्हरीच्यावेळी तब्बल तीन कॅमेऱ्यांचा वापर करून हे चित्रीकरण करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर, नर्स यांच्यासोबतच या चित्रपटाच्या टीममधील तीन मेंबर्स उपस्थित होते.

ठळक मुद्देकालीमन्नी या चित्रपटासाठी श्वेता मेनन या अभिनेत्रीने तिच्या डिलीव्हरीचे चित्रीकरण करण्याची परवानगी चित्रपटाच्या टीमला दिली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट महिलांना कोणकोणत्या आव्हांनाना सामोरे जावे लागते त्यावर आधारित होता.

चित्रपटात दाखवलेले दृश्य हे लोकांना खरे वाटावे यासाठी दिग्दर्शक प्रचंड मेहनत घेत असतात. चित्रपटातील प्रत्येक कलाकार आपली भूमिका चांगली व्हावी यासाठी मेहनत घेत असतो. काही कलाकार आपल्या भूमिकेसाठी कित्येक किलो वजन वाढवतात, तर काही कमी करतात. काही कलाकार तर कित्येक तास प्रोस्थेटिक मेकअप करून चित्रपटांचे चित्रीकरण करतात. पण एका अभिनेत्रीने चक्क तिच्या डिलिव्हरीचे चित्रीकरण करण्याची परवानगी दिली होती आणि हे दृश्य एका चित्रपटात वापरण्यात देखील आले होते. 

कलीमन्नू या चित्रपटासाठी श्वेता मेनन या अभिनेत्रीने तिच्या डिलीव्हरीचे चित्रीकरण करण्याची परवानगी चित्रपटाच्या टीमला दिली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट महिलांना कोणकोणत्या आव्हांनाना सामोरे जावे लागते त्यावर आधारित होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शक ब्लेसीने नायिका गर्भवती असताना तिच्या डिलीव्हरीचे चित्रीकरण करण्याचा विचार केला आणि नायिकेने देखील यासाठी होकार दिला. कारण हे दृश्य चित्रपटाच्या कथेसाठी अतिशय आवश्यक होते. श्वेता पाच महिन्यांची गर्भवती असताना या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. तीन तासांच्या या चित्रपटात डिलीव्हरीचा सीन तब्बल ४५ मिनिटांचा होता. श्वेताच्या डिलीव्हरीच्यावेळी तब्बल तीन कॅमेऱ्यांचा वापर करून हे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणाच्यावेळी डॉक्टर, नर्स यांच्यासोबतच या चित्रपटाच्या टीममधील तीन मेंबर्स उपस्थित होते. श्वेताला मुलगी झाली होती. 

श्वेताच्या या निर्णयात तिच्या पतीने देखील तिला साथ दिली होती. केवळ या एका सीनसाठी या चित्रपटाचे चित्रीकरण अनेक महिने थांबवण्यात आले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री होती. पण या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.   

टॅग्स :बॉलिवूड