Join us  

‘सिंघम गर्ल’ची बहिण आहे तिच्यापेक्षाही सुंदर; म्हणून सोडले करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 8:00 AM

फोटो पाहून पडाल प्रेमात

ठळक मुद्देनिशा सिनेमात अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनी फोटो व्हायरल झाले होते.

‘सिंघम’ या सिनेमात अजय देवगणच्या अपोझिट दिसलेली अभिनेत्री काजल अग्रवाल हिचे हॉट फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. म्हणायला काजोल साऊथची अभिनेत्री. पण बॉलिवूडमध्येही तिची वेगळी ओळख आहे. पण आज आम्ही काजलबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, काजलची ही बहीण तिच्याइतकीच सुंदर आहे.

ही काजलची लहान बहीण. तिचे नाव निशा अग्रवाल. अनेकांना माहित नसेल पण निशा ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. काजलपेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या निशाने 2010 मध्ये तेलगू सिनेमा ‘’मधून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. यानंतर अनेक तामिळ, तेलगू व मल्याळम सिनेमांत काम केले.

निशाने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्यामुळे साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सध्या निशा चित्रपटांपासून दूर आहे. याचे कारण म्हणजे, लग्नानंतर चित्रपट न करण्याचा तिने घेतलेला निर्णय.

होय, 2013 मध्ये निशाने लग्न केले. तिचा पती बिझनेसमॅन आहे. लग्नानंतर सिनेसृष्टीला तिने रामराम ठोकला. ‘कजिन्स’ या सिनेमात ती अखेरची झळकली होती.

निशा सिनेमात अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनी फोटो व्हायरल झाले होते.

काजलबद्दल सांगायचे तर तिने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये  ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

टॅग्स :काजल अग्रवाल