Join us

सौंदर्या करणार दुसरे लग्न, कोण आहे रजनीकांत यांचा होणारा जावई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 13:46 IST

अखेर तर्कवितर्कांना पूर्णविराम देत रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. होय, याच महिन्यांत येत्या ११ फेब्रुवारीला सौंदर्या उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

अखेर तर्कवितर्कांना पूर्णविराम देत रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. होय, याच महिन्यांत येत्या ११ फेब्रुवारीला सौंदर्या उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तूर्तास या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. सौंदर्याने खुद्द याचा खुलासा केला.

सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाहीत. कनिकाने निर्माता वरूण मनियनसोबत दुसरे लग्न केले आणि विशगनही सौंदयार्सोबत लग्न करण्यास सज्ज आहे. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता.

२०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदयार्ने टिष्ट्वटरवरून जाहिर केले होते.

टॅग्स :रजनीकांत