Join us  

या जगात नसली तरी आजही सौंदर्याची जादू आहे कायम, सूर्यवंशम चित्रपटातून झाली होती लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 6:11 PM

सौंदर्याने सूर्यवंशम या केवळ एकच हिंदी चित्रपटात काम केले असले तरी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते.

सूर्यवंशम आजही अनेक लोक वारंवार पाहताना दिसतात. आजही हा चित्रपट छोट्या पडद्यावर पहायला मिळतो. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री सौंदर्याने काम केले होते. तसा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटातून सौंदर्या लोकप्रिय ठरली होती.

 

 

सौंदर्याने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सौंदर्याने सूर्यवंशम या केवळ एकच हिंदी चित्रपटात काम केले असले तरी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. आजही 'सूर्यवंशम' चित्रपटातील अमिताभ यांच्या प्रमाणे सौंदर्याची भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहे.

तिने अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. त्यामध्ये अभिनेते रजनीकांत, कमल हसन या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. पण 'सूर्यवंशम' चित्रपटातील बिग बीसोबत त्यांची जोडी हिट ठरली. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बरेच सिनेमात झळकली आहे.१२ वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकूण १४ सिनेमात काम केले होते. 

सौंदर्या व्यावसायिक आणि चित्रपट लेखक-निर्माता केएस सत्यनारायण यांची मुलगी होती. सौंदर्या एमबीबीएस करत होती तेव्हा तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला चित्रपटांची ऑफर दिली होती. त्यानंतर तिने शिक्षण सोडले आणि ती अभिनेत्री झाली. सूर्यवंशम चित्रपटाच्या केवळ पाच वर्षांनंतर सौंदर्याचे निधन झाले. सौंदर्या १७ एप्रिलला भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे एअरक्राफ्टने जात होती. फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्टने बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून तिच्या एअरक्राफ्टने उड्डाण केल्यानंतर १०० फूट वरती जाताच तिचे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. 

त्यावेळी सौंदर्या केवळ ३१ वर्षांची होती. हा अपघात इतका भीषण होता की, तिच्या घरच्यांना तिचे शव देखील मिळाले नव्हते. मृत्यूच्या केवळ वर्षभराअगोदर सौंदर्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर जी. एस. रघूसोबत प्रेमविवाह केला होता. सौंदर्याचा अपघात झाला त्यावेळी ती गर्भवती होती.१८ जुलै १९७२ ला जन्मलेल्या सौंदर्याने १९९२ साली तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचे वडील एस. नारायण हे एक बिझनेसमन आणि कन्नड चित्रपटांचे लेखक होते.

टॅग्स :अमिताभ बच्चन