Join us  

7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्रीसोबत केले होते सोनू निमगने लग्न, पत्नी कधीच नसते लाईमलाइटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 5:18 PM

सोनू निगमचा कॉन्सर्ट असो किंवा मग काही खास ठिकाणी तो परफॉर्म करणार असेल तर त्याचे आउटफिट्स मधुरिमा स्वतः डिजाइनर करते. मधुरिमाचा काउचर ब्रांड आहे,ज्याचे नाव 'मधुरिमा निगम' असे आहे.

बॉलीवुड गायक सोनू निगमने आपल्या गायकीने रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याच्या सुरांची जादू  जादू दाखवणाऱ्या सोनू निगमची लव्हस्टोरीही सिनेमाच्या कथेला साजेल अशीच आहे. १५ वर्षाने लहान असणारी अभिनेत्री मधुरिमा निगमसोबत सोनू निगमने लग्न केले आहे. एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. तिथूनच या दोघांची लव्हस्टोरीला खरी सुरुवात झाली होती. ७ वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी  2002मध्ये मधुरिमासोबत सोनू रेशीगाठीत अडकला. 

लग्न अतिशय भव्य पद्धतीने पार पडले होते. मोठ्या थाटामाटात घोड्यावरून सोनूची लग्नाची वरात निघाली होती. आलिशान अशी सजावट त्याच्या लग्नमंडपात करण्यात आली होती. लग्नात 700 पाहुणे उपस्थित होते, ज्यात शिल्पा शेट्टी, गायक अभिजीत, अनुप जलोटा आदींचा समावेश होता.सोनू निगमच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात मुलाचे आगमन झाले होते. 2007 मध्ये मधुरिमाने मुलाला जन्म दिला होता. नेवान असे मुलाचे नाव आहे. सोनू निगम नेवानलाही गायनाचे धडे देत असतो. अनेकदा नेवानचे गाण्याचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. मधुरिमा मात्र कधीच लाईमलाइटमध्ये नसते. तिला प्रसिद्धीपासून दूरच राहणे पसंत आहे.

इतकचे काय तर ती कोणत्याच बॉलिवूड पार्ट्या आणि सोहळ्यांमध्येही उपस्थित नसते. खासगी आयुष्यातच ती जास्त बिझी असते.विशेष म्हणजे सोनू निगमचा कॉन्सर्ट असो किंवा मग काही खास ठिकाणी तो परफॉर्म करणार असेल तर त्याचे आउटफिट्स मधुरिमा स्वतः डिजाइनर करते. मधुरिमाचा काउचर ब्रांड आहे,ज्याचे नाव 'मधुरिमा निगम' असे आहे.

टॅग्स :सोनू निगम