Join us

तन्मयविरुद्धच्या वक्तव्याने सोनमला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 18:23 IST

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतल्या तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर आलेल्या रिअ‍ॅक्शनवर सोनम कपूरला धक्का बसला आहे. एआयबीच्या ...

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीतल्या तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर आलेल्या रिअ‍ॅक्शनवर सोनम कपूरला धक्का बसला आहे. एआयबीच्या समर्थनार्थ तिने अनेक ट्विट केले आहेत. सोनमच्या अनुसार भट्टच्या व्हिडिओला चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. आपल्या ट्विटमध्ये सोनम म्हणते, तुझा मित्र म्हणून तु जे काही काही म्हणतो आणि करतो ते चुकीचे नसते. त्यामुळे लोक हसतात. तन्मयच्या जोक्सपेक्षा सध्या काही महत्वाचे नाही का? मला असे वाटते की सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनाही याबाबतीत काही माहिती नसावे. याबाबतीत अनुपम खेर, सुभाष घई, रितेश देशमुख, सतीश कौशिक यांनीही आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला नऊ वेळा उत्कृष्ट कॉमेडियन अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. मला विनोद कळतो, मात्र हा विनोद नसल्याचे अनुपम खेरने म्हटले आहे. तन्मयने अत्यंत घाणेरडे जोक्स सांगितले आहेत. हे लज्जास्पद आणि शिक्षेस पात्र आहे. मी लोकांसमोर नग्न फिरणार, तुम्ही माझ्याकडे पाहू नका असे तो म्हणतो. हे कसे शक्य असल्याचे सुभाष घई म्हणतात.