Join us  

इतकी वर्षं बॉलिवूडमध्ये काम करूनही आलिया भटची आई सोनी राजदान यांना आहे ही खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 9:44 AM

मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे.

ठळक मुद्देलोकांनी मला एक कलाकार म्हणूनच ओळखावे असे मला वाटते. माझी ओळख निर्माण करण्यासाठी मी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. आता तर लोक मला महेश भट यांच्या पत्नीप्रमाणेच आलियाची आई म्हणून ओळखतात.

सोनी राजदान यांनी 36 चौरंगी लेन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. त्यांनी नजर, लव्ह अफेअर यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सोनी राजदान अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत असल्या तरी त्यांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

1986 मध्ये सोनी राजदान यांनी महेश भट यांच्यासोबत लग्न केले. ते प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पूजा भट, आलिया भट या त्यांच्या मुलींनी देखील बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. आलिया ही सोनी आणि महेश यांची मुलगी आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. पण आजही तिच्या आईला बॉलिवूडमधील तिची एक वेगळी ओळख मिळालेली नाही याची त्यांना खंत आहे. याविषयी पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले, महेश भट यांची पत्नी म्हणून मला ओळखले जाते. पण मी देखील एक कलाकार आहे. 

लोकांनी मला एक कलाकार म्हणूनच ओळखावे असे मला वाटते. माझी ओळख निर्माण करण्यासाठी मी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. आता तर लोक मला महेश भट यांच्या पत्नीप्रमाणेच आलियाची आई म्हणून ओळखतात. खरं सांगू तर मला याचा आनंद आहेच. पण मी माझ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. लोकांना माझ्या कामाची, संघर्षाची जाणीव व्हावी हीच माझी इच्छा आहे. 

युअर्स ट्रूली या झी 5 च्या चित्रपटात सोनी राजदान आता दिसत असून ऐनी जैदी यांच्या द वन दॅट वॉज अनाऊन्सड या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. यात एका महिलेची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही महिला लवकरच नोकरीतून निवृत्त होणार असून निवृत्तीनंतर ती सगळ्यात जास्त रेल्वेच्या अनाऊंसमेंटला मिस करेल असे तिला वाटत आहे. हा चित्रपट एकटेपणावर आणि प्रेमावर भाष्य करत आहे. 

टॅग्स :आलिया भटमहेश भट