Join us  

बैरी, बेईमान, बागी सावधान...! पाहा, ‘सोन चिरैया’ चा दमदार टीजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 12:50 PM

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. होय, काही तासांपूर्वी या चित्रपटाचे दुसरे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि यानंतर लगेच टीजर रिलीज करण्यात आला.  ‘सोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे. इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.

  सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  या सगळ्यांची झलक  टीजरमध्ये दिसतेय. पण  सुशांत व भूमीला या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे. दोघेही पहिल्यांदा अशा आगळ्या-वेगळ्या रूपात दिसत आहेत. अलीकडे एका मुलाखतीत, या चित्रपटातील भूमिका मी केवळ एक आव्हान म्हणून स्वीकारल्याचे सुशांतने सांगितले होते. हे आव्हान पेलण्यात सुशांत किती यशस्वी झाला हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरचं कळेल. तूर्तास चित्रपटाचा टीजर पाहून सुशांत या भूमिकेत अगदी फिट बसल्याचे दिसतेय. तुम्हीही टीजर पाहा आणि तुम्हाला काय वाटते, ते जरूर कळवा. ‘सोन चिरैया’मध्ये १९७० च्या दशकातील कथा  पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे. 

टॅग्स :सोन चिरैयासुशांत सिंग रजपूतभूमी पेडणेकर