Join us

बॉयफ्रेंड अहुजासोबत सोनमचे पुढील वर्षी ‘शुभमंगल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:27 IST

तुम्ही ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूरचे चाहते आहात का? मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ सोनम कपूर नव्या ...

तुम्ही ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूरचे चाहते आहात का? मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ सोनम कपूर नव्या वर्षांत बोहल्यावर चढणार असल्याची बातमी आहे. होय,  बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबद्ध होण्यास सोनम अखेर सज्ज झाली आहे.                           सोनम आणि आनंद एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करत आहेत. पण, आता दोघेही त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता देऊ इच्छित आहेत. कपूर कुटुंबियांनी  आनंद अहुजाला जावई म्हणून स्विकारल्यानंतर सोनमने लग्नाचा निर्णय घेतल्याचे कळतेयं.                           आनंद अहुजा हा बिझनेसमॅन असून तो टेक्स्टाईल कंपनी चालवतो. ‘मिर्झियाँ’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूरने आनंदच्या ब्रँडचे कॉस्च्युम घातले होते. नुकतेच करिनानेही अहुजाच्या ब्रँडचा एक शर्ट त्याच्या शॉपमधून खरेदी केला. हा शर्ट खरेदी करतानाचा करिनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो  पहिल्यांदा सोनमनेच रिटिवट केला होता.