Join us  

होय, जगातले सगळे फॅशन ट्रेंड तूच सुरु केलेत! ट्रोलर्सने सोनम कपूरला सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:55 PM

ट्रोल होणे नवे नाही. सेलिब्रिटी पोस्ट करतात आणि ट्रोलर्स त्यांना ट्रोल करतात. सोनम कपूर तर अनेकदा ट्रोल झालीय. एका ताज्या पोस्टवरून ट्रोलर्सने पुन्हा एकदा सोनमला लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्दे सोनमने एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर लोकांचा आक्षेप नव्हता. पण या फोटोसोबतचे कॅप्शन वाचून मात्र काहींची सटकली.

ट्रोल होणे नवे नाही. सेलिब्रिटी पोस्ट करतात आणि ट्रोलर्स त्यांना ट्रोल करतात. सोनम कपूर तर अनेकदा ट्रोल झालीय. एका ताज्या पोस्टवरून ट्रोलर्सने पुन्हा एकदा सोनमला लक्ष्य केले आहे. होय, कालच सोनमने ही पोस्ट केली आणि लोकांनी तिला नाही नाही ते सुनावले. काल सोनमने एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर लोकांचा आक्षेप नव्हता. पण या फोटोसोबतचे कॅप्शन वाचून मात्र काहींची सटकली.

‘ अ‍ॅक्टर्स आपल्या नव्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत, हे पाहून मी खुश आहे. यामुळे नव्या डिझाईनर्सला प्रेरणा मिळले,’ असे सोनमने लिहिले. इतकेच नाही तर बहीण रिया कपूरला हिला टॅग करत, ‘हा ट्रेंड आपण सुरु केला, याचा मला आनंद आहे,’ असे सोनमने लिहिले. सोनमने हे पोस्ट शेअर केली आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

‘जगातील सर्व फॅशन ट्रेंड तुच सुरु केलेत,’असा टोला एका युजरने लगावला. यानंतर एकाने सोनमला ‘ओव्हर कॉन्फिडेंट’ ठरवून टाकले.

एकाने तर, तू अशी बोलतेयेस जणू तू युएसची प्रेसिडेंट आहेस, अशा शब्दांत सोनमला सुनावले. अनिल कपूर तुझे वडिल नसतील तर तुला कुणीही ओळखले नसते, अशा शब्दांत एकाने सोनमचा क्लास घेतला.

मध्यंतरी सोशल मीडियाला कंटाळून सोनमने टिष्ट्वटरवरून ब्रेक घेतला होता. ‘काही काळासाठी ट्विटरपासून दूर जातेय. येथे प्रचंड नकारात्मकता आहे. सर्वांना प्रेम...,’असे ट्विट तिने केले होते. ट्विटर सोडण्याच्या निर्णयापूर्वी सोनमने मुंबईतील खराब रस्त्यांवर आणि वाढत्या प्रदूषणावर पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून तिच्यात आणि एका ट्विटर युजरमध्ये चांगलीचं जुंपली होती. यानंतर सोनमने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने ट्विटर सोडल्यानंतर तर जणू युजर्सला आणखीच तेव चढला होता. ‘बहन हम तुम्हे जरा भी मिस नहीं करेंगे, मौका मिले तो होली दीपावली में आते रहना,’असे युजरने लिहिले होते.

टॅग्स :सोनम कपूर